शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: मंगळ-बुधाचे परिवर्तन: या ‘५’ मूलांकांना अपार यशाची संधी, व्यापारात मोठा लाभ; भाग्योदय काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 3:45 PM

1 / 12
मे महिन्याला सुरुवात झाली आहे. २ मे रोजी शुक्राचे वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर झाल्यानंतर आता नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ मिथुन राशीतून कर्क राशीत विराजमान होत आहे. तसेच नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुधाचा मेष राशीत उदय होत आहे. (Numerology)
2 / 12
१० मे रोजी बुधाचा मेष राशीत उदय होत आहे तर लगेच ५ दिवसांनी १५ मे रोजी बुध मेष राशीत मार्गी होणार आहे. काही दिवसांपूर्वी बुध मेष राशीत वक्री झाला होता, तसेच अस्तंगतही झाला होता. याच दरम्यान नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
3 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. आगामी काळातील मंगळ व बुधाचे परिवर्तन कोणत्या मूलांकांसाठी लाभदायक ठरू शकते, कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आत्मविश्वास वाढू शकेल. कामात यश मिळू शकेल. हुशारीने काही प्रश्न मार्गी लावू शकाल. राजकीय व्यक्तींना लाभ मिळू शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. संयम आणि धीराने काम करावे. आवेशात येऊन कोणतीही गोष्ट करू नये. रागावर नियंत्रण ठेवावे. बोलताना विचार करावा. मतभेद-वादविवादाला सामोरे जावे लागू शकते. नोकरीत यश मिळू शकते. हनुमान चालीसा पठण करणे उपयुक्त ठरू शकेल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. हाती घेतलेली कामे यशस्वी ठरू शकतील. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतील. आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. देवी सुक्ताचे पठण फायदेशीर ठरू शकेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. सरळमार्गी स्वभावाचा लाभ मिळू शकेल. एखादी भेटवस्तू मिळू शकेल. परदेशात जायची इच्छा प्रयत्नपूर्वक यशस्वी ठरू शकेल. मानसिक शांततेसाठी गायत्री मंत्राचे पठण करणे हिताचे ठरू शकेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. मानसिक शांतता मिळू शकेल. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरू शकतील. लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. विवाहेच्छुकांची बोलणी पुढे सरकू शकतील. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायक ठरू शकेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भविष्यातील योजना बनवून त्यानुसार व्यवहार, कार्य करणे हिताचे ठरू शकेल. शेअर बाजारात मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. समाजात मान-सन्मान वाढेल. सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकेल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आर्थिक समस्या दूर होऊ शकतील. नवीन प्रोजेक्ट मिळू शकेल. कार्यक्षेत्रात कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. नव्या नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आगामी काळ सुखकारक ठरू शकेल. नवीन ओळखी भविष्यात लाभप्रद ठरू शकतील. आर्थिक लाभ होऊ शकेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतील.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. नातेवाइकांशी मतभेद होऊ शकतात. वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. व्यापाऱ्यांना लाभ होऊ शकतो. कामात यशप्राप्ती होऊ शकते. हनुमान चालीसा पठण करणे भाग्यकारक ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष