शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mars Transit 2022: वृषभ राशीत होणार मंगळाचे संक्रमण, 'या' ४ राशींना पुढील ३ महिने राहावे लागेल सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 7:13 PM

1 / 5
१० ऑगस्ट रोजी रात्री ९. १० मिनिटांनी मंगळ ग्रह मेष राशी सोडून राहू बरोबर वृषभ राशीत प्रवेश करेल. आणि मग पुढच्या वर्षी मार्चच्या मध्यापर्यंत, तो प्रतिगामी मार्गाने प्रवास करेल. ज्यामध्ये तो ५ महिन्यांहून अधिक काळ वृषभमध्ये राहील. १० ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर या कालावधीत वृषभ राशीच्या मंगळाच्या संचारादरम्यान पुढील चार राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
2 / 5
मंगळाच्या स्थित्यंतरामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर तसेच अन्य ध्येयपूर्तीच्या बाबतीत यश हुलकावणी देईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. जवळच्या व्यक्तींशी वाद होतील. त्यामुळे स्वतःवर शक्य तेवढा संयम ठेवा. अन्यथा आर्थिक नुकसानही संभवते. ग्रहांचे परिणाम आपल्या व्यक्तिगत जीवनावर होत असतात. अशा वेळी मन शांत ठेवावे. देवाचे नाव घ्यावे. परिस्थितीतून आपॊआप मार्ग निघेल.
3 / 5
मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत काहीसे नुकसान सहन करावे लागेल. आरोग्य, शिक्षण, वाढते खर्च यामुळे आर्थिक गणिते बिघडू शकतात. यासाठी या काळात अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. मोठे खर्च शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या अन्यथा अधिकतर पैसा त्यावर खर्च होऊ शकतो.
4 / 5
तूळ राशीच्या लोकांसाठीही मंगळाचे संक्रमण थोडे आव्हानात्मक असेल. कारण या काळात तुमच्यासोबत असे काही घडू शकते, ज्यासाठी तुम्ही तयार नसाल. यामुळे तुम्हाला मानसिक तणावही जाणवेल. तसेच, या काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि भाषेत सुधारणा करावी लागेल. अन्यथा, तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या जोडीदाराला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला दुखवू शकते.
5 / 5
मीन राशीच्या लोकांनी मंगळ संक्रमणादरम्यान आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे तुमची चिडचिड होऊन घरच्यांशी वाद होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. हा सगळा समतोल सांभाळण्यासाठी मन शांत ठेवा आणि देवाचे नाव घेत आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. हेही दिवस जातील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष