शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:47 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित वेळेप्रमाणे राशीपरिवर्तन करत असतात. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही राशी शनीचे स्वामित्व असलेल्या आहेत. विद्यमान स्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे.
2 / 9
यामुळे मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश झाला की, शनी आणि मंगळ यांचा युती योग जुळून येणार आहे. हा योग विशेष मानला जात आहे. सुमारे ३० वर्षांनी कुंभ राशीत मंगळ आणि शनी यांचा युती योग जुळून येणार असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
मंगळ ग्रहाचा होत असलेला कुंभ प्रवेश आणि शनी ग्रहाशी जुळून येत असलेला युती योग कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? आर्थिक आघाडीसह नोकरी, करिअर, बिझनेस, कुटुंब, व्यवसाय, शिक्षण या आघाड्यांवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
मेष: भाग्याची आणि नशिबाची उत्तम साथ लाभेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. यवसायात चांगला नफाही दिसून येईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढवू शकतील. अनेक स्त्रोत उघडतील. हुशारीने वागावे लागेल. घाईघाईने कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संयम राखला तर जीवनात पुढे प्रगती करू शकाल. कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे विचारात घ्या.
5 / 9
वृषभ: नवीन नोकरीची चांगली बातमी मिळू शकते. परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांचाही मार्ग मोकळा होईल. परदेश प्रवासाचे सौभाग्य प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी थोडी सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी, अधिकारी आणि विशेषत: बॉसशी समन्वय ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
6 / 9
तूळः शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना नशिबाची साथ मिळेल. कामे मार्गी लागतील. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतील. यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी कार्याशी संबंधित लोकांनाही लाभ मिळू शकेल.
7 / 9
धनु: नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत मान, पद आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना नवीन आणि चांगली संधी मिळू शकते. तुम्हाला नशीब मिळेल. लव्ह लाईफ चांगली राहील. काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.
8 / 9
कुंभ: मंगळ आणि शनीची युती फलदायी ठरू शकेल. करिअरमध्ये नशिबाची साथ लाभू शकेल. उच्च पद प्राप्त होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीत चांगला लाभ मिळण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये अनेक संधी मिळतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य