शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 8:08 AM

1 / 9
जून महिन्याची सुरुवात नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाच्या गोचराने होणार आहे. मंगळ ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाचे स्वराशीत म्हणजेच मेष राशीत होत असलेले गोचर विशेष मानले गेले आहे.
2 / 9
मंगळ आपल्या मेष या मूलत्रिकोण राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे ४२ दिवस मंगळ या राशीत असल्याचे बोलले जात आहे. मंगळ ग्रह महाबली होत अनेक राशींना लाभदायी फले देऊ शकतो, असे सांगितले जात आहे. मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशाने रुचक नामक राजयोगही जुळून येत आहे.
3 / 9
मंगळाचे स्वराशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना उत्तम अनुकूल ठरू शकेल? करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचे गोचर लाभदायी सिद्ध होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येऊ शकेल. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. उत्पन्नात कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाढ होऊ शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे गोचर उत्तम अनुकूल ठरू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कामाचे कौतुक होईल. उच्च अधिकारी बढती करू शकतात. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. चांगला नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहू शकेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचरामुळे जीवनात चांगले काही घडू शकते. मेहनत आणि समर्पण आता फळ देईल. कामाच्या ठिकाणी केलेले काम सर्वांना दिसेल. प्रगती होऊ शकते. वरिष्ठांच्या मदतीने ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. सरकारी नोकरीची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचरामुळे धनलाभाची संधी मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसायात उत्तम यश मिळू शकेल. पैसे कमविणे आणि बचत करणे या दोन्हीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे मंगळ ग्रहाच्या गोचरामुळे प्रभुत्व आणि प्रभाव वाढू शकेल. वादविवाद आणि स्पर्धेत यश मिळू शकेल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतील.
9 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचराचा लाभ मिळू शकतो. शेअर बाजारातून फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये भरभराट आणि नोकरीत यश मिळू शकेल. शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास काळ अनुकूल ठरू शकेल. मुलांची प्रगती पाहून तुम्ही समाधानी व्हाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य