शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mangal Gochar May 2023: मंगळाचा कर्क प्रवेश: ‘या’ ९ राशींना अनुकूल, बड्या बदलाचे संकेत; धनलाभ योग, तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 3:04 PM

1 / 15
मे महिना ग्रह गोचराचा दृष्टिने महत्त्वाचा मानला जात आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीतून चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत विराजमान होत आहे. १० मे रोजी मंगळ कर्क राशीत विराजमान होत असून, ३० जून रोजी मंगळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 15
मंगळाचा होत असलेला कर्क प्रवेश अनेकार्थाने विशेष मानला गेला आहे. मंगळ पराक्रम, साहस, ऊर्जा, आक्रमकता यांचा कारक मानला जातो. केवळ १२ राशींवर नाही, तर देश-दुनिया, अर्थव्यवस्था यांवर मंगळाच्या गोचराचा प्रभाव दिसून येऊ शकतो, असे सांगितले जाते. मंगळाचे कुंडलीत स्थान चांगले असेल तर जातकाला चांगली फळे मिळू शकतात, असे म्हटले जाते.
3 / 15
जातकाच्या कुंडलीत मंगळ प्रतिकूल स्थानी असेल, तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सुमारे ५० दिवस मंगळ कर्क राशीत विराजमान राहणार असून, कोणत्या राशींवर याचा कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींवर मंगळाची कृपा होऊ शकेल, कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल.जोडीदारासोबतची नाराजी दूर होऊ शकेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळू शकतील. नोकरदारांनी वादांपासून दूर राहावे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. इतर गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका, महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करायची असेल, ती इच्छा या काळात पूर्ण होऊ शकेल. नोकरदारांसाठी मंगळाचे गोचर अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांपासून दूर राहा. कामावर लक्ष केंद्रित करा. संयमाने गोष्टी हाताळा. जोडीदारासोबत छोट्या ट्रिपलाही जाऊ शकता. सामाजिक कार्यातून मान-सन्मान मिळू शकेल. विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही.
7 / 15
कर्क राशीत मंगळाचा प्रवेश होत असून, पुढील ५० दिवस मंगळ या राशीत असेल. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तणाव वाढू शकतो. एकट्याने वेळ घालवायला आवडेल. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायाच्या दृष्टीने फारसे चांगले नाही, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा अन्यथा वाद वाढू शकतो. प्रवासात लाभ मिळू शकतील. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. व्यापार्‍यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश लाभदायक ठरू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. आर्थिक अडचणी हळूहळू संपू शकतील. व्यवसायात चांगला नफा होऊ शकेल. नोकरदारांना नोकरीत चांगले बदल दिसू शकतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. पालकांशी नाते घट्ट होऊ शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. दृष्टिकोनात बदल होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. जमीन खरेदीसाठी वेळ अनुकूल राहू शकेल. व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकेल. सर्व कामे धैर्याने पूर्ण कराल. विनाकारण कोणाशीही वाद घालू नये.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नोकरी बदलण्याची योजना यशस्वी होऊ शकेल. उत्पन्नही वाढू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खास ठरू शकेल. ध्येय पूर्ण करण्यासाठी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कामाच्या व्यापात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आघाडीवर काही अडचणी येऊ शकातात. मात्र, अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. मित्रांसोबत चांगला काळ घालवू शकाल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. वायफळ चर्चेपासून दूर राहा. व्यापार्‍यांसाठी आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. प्रगतीची शक्यता निर्माण होत आहे. एखादी मोठी ऑर्डरही अचानक मिळू शकते.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. मात्र, आर्थिक स्थिती सुधारू शकेल. चुकीची संगत आणि नकारात्मक विचार टाळावे. कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली राहू शकेल. विरोधकांना चितपट करू शकाल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. अडकलेले पैसेही मिळू शकतात.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थ्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. परंतु शिक्षकांच्या सहकार्याने आणि आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यशही मिळू शकेल. उत्पन्न वाढू शकेल. मित्रांकडून अडकलेले पैसे मिळू शकतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. परदेशात जाण्याची मनोकामनाही पूर्ण होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य