शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२२ महिन्यांनी मंगळ स्वराशीत: ६ राशींचे मंगल, पद-पैसा वृद्धी; व्यापारात नफा, नवी डील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 7:07 AM

1 / 15
नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाने स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सुमारे २२ महिन्यांनंतर मंगळ वृश्चिक राशीत विराजमान झाला आहे. वृश्चिक रास ही मंगळाचे स्वामित्व असलेली रास असून, या राशीत मंगळ मजबूत होतो, असे मानले जाते.
2 / 15
वृश्चिक राशीत मंगळ ग्रहाबरोबरच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य विराजमान होत आहे. वृश्चिक राशीत आताच्या घडीला बुध ग्रह आहे. मंगळाच्या प्रवेशामुळे वृश्चिक राशीत अनेक शुभ योग जुळून आले आहेत. मंगळ आणि सूर्य यांचा आदित्य मंगल योग, सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग, रुचक योग, आयुष्मान योग, त्रिग्रही योग जुळून आला आहे.
3 / 15
मंगळाचा वृश्चिक प्रवेश ६ राशींना अतिशय उत्तम मानला जात आहे. नोकरी, करिअर, बिझनेस यामध्ये सर्वोत्तम संधी मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. मात्र, काही राशींसाठी आगामी काळ काहीसा संमिश्र ठरणारा आहे. तुमच्यावर मंगळ गोचराचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: नोकरी किंवा व्यवसायात कोणतीही जोखीम घेणे योग्य नाही. जीवनात समस्या वाढू शकतात. प्रेम जीवनात भांडणे व वाद वाढू शकतात. खाण्याच्या सवयींवर संयम ठेवा. भाषेत संतुलित शब्द वापरा. करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल टाळा.
5 / 15
वृषभ: भागीदारीच्या कामात अडचण येऊ शकते. वैवाहिक जीवनात समस्या वाढू शकतात. दैनंदिन कामे हुशारीने करा. कोणाचा सल्ला घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायात काही अनावश्यक समस्या वाढू शकतात. जमीन खरेदीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा आणि तळलेले अन्न खाऊ नका.
6 / 15
मिथुन: शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. करिअरमध्ये शुभ प्रभाव वाढतील. योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यापार, व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कोणत्याही बाबतीत निष्काळजी राहणे टाळा.
7 / 15
कर्क: तेलकट अन्न खाणे टाळावे. आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांशी उत्तम समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वासाने काम केल्यास यश मिळेल. जीवनात संयम बाळगा. जोडीदाराशी कोणत्याही गोष्टीवर भांडू नका.
8 / 15
सिंह: आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो. आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात. घरगुती बाबींमध्ये अडचणी वाढू शकतात. विद्युत उपकरणे सावधगिरीने वापरावीत. बराचसा पैसा आजारांवर खर्च होऊ शकतो.
9 / 15
कन्या: जीवनात शुभ प्रभाव वाढतील. करिअरशी संबंधित योजना यशस्वी होतील. करिअरशी संबंधित काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात दीर्घकाळ रखडलेली एखादी योजना पुन्हा सुरू होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.
10 / 15
तूळ: आयुष्यात काही समस्या अचानक वाढू शकतात. वागण्यात नम्रता ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडू शकतात. कुटुंबात काही कारणाने तणाव वाढू शकतो. खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे, काळजी घ्यावी.
11 / 15
वृश्चिक: जीवनात अचानक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वभावातील आक्रमकपणा वाढू शकतो. रागाच्या वेळी शांत राहा. डोकेदुखी आणि तापाचा त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी पैसे वाचवा.
12 / 15
धनु: आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांवर आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा कोणीतरी विश्वासघात करू शकेल. निद्रानाशाची समस्या असू शकते.
13 / 15
मकर: आगामी काळ शुभ मानला जात आहे. नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित नफा अपेक्षित आहे. आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा वाढेल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात. जमिनीशी संबंधित एखाद्या व्यवहारात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
14 / 15
कुंभ: शुभ प्रभावात वृद्धी होऊ शकते. परिश्रम करून यश मिळेल. मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. सर्व कामांमध्ये मेहनत घेतल्याने फायदा होईल. काम उत्साहाने केले तर बरे होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी समन्वय चांगला राहील. अनुकूल परिणाम मिळतील.
15 / 15
मीन: नफा होईल. आयुष्यात यशाचा टप्पा सुरू होईल. करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू लागतील. आत्मविश्वास संतुलित ठेवा. काम पूर्ण मेहनत आणि समर्पणाने करा. अतिआत्मविश्वास टाळल्यास चांगले राहील. वडिलांच्या मार्गदर्शनाने जे काही काम कराल त्याचा फायदा होईल. सावधगिरीने वाहन चालवा आणि वादात पडणे टाळा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य