शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० ऑगस्टला मंगळाचा वृषभ प्रवेश: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मिळेल मेहनतीचे फळ; होईल नफा दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 8:32 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, या संपूर्ण महिन्यात गुरु आणि शनी आपापल्या राशींमध्ये वक्री आहेत. महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलेला असेल. यासोबतच ऑगस्टमध्ये सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुधसह अनेक ग्रह राशीपरिवर्तन करतील. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी बुधने सिंह राशीत प्रवेश केला आहे. (mars transit in taurus 2022)
2 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑगस्ट रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल. ०७ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रहाने कर्क राशीत विराजमान झालेला असून, महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्टला शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान होईल. (mangal in vrishabha rashi 2022)
3 / 9
यासह आणखी एक महत्त्वाचा राशीबदल होणार आहे, तो म्हणजे नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह. आपले स्वामित्व असलेल्या मेष राशीतून १० ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार असून, १६ ऑक्टोबरनंतर तो बुधचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेशित होईल. मंगळाच्या वृषभ प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 9
मंगळाचा वृषभ प्रवेश याच राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमचे आणि तुमच्या आईचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. काही लोकांना मालमत्ता विकून किंवा खरेदी करून नफा मिळेल. तसेच, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचा वृषभ प्रवेश शुभ ठरू शकेल. या कालावधीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे गोचर अतिशय उपयुक्त ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत फळाला येईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्येही उर्जेने प्रगती करू शकाल. जर तुम्ही विवाहित असाल तर मंगळाच्या कृपेने तुमच्या जोडीदाराला चांगली बढती मिळेल, ज्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल.
6 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा वृषभ प्रवेश यशकारक ठरू शकेल. तुमच्या कामात किंवा तुमच्या क्षेत्रात सर्वांत अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. विशेषत: तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. यावेळी, तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही तुमचा समजूतदारपणा दाखवून तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते सुधारण्यास सक्षम होऊ शकाल.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचा वृषभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तुमची ऊर्जा पातळी अचानक वाढेल. तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करताना त्यातून सर्वोत्तम मिळविण्यास मदत करेल. जर तुम्ही तुमच्या पगारवाढीची किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येईल. विवाहित लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील.
8 / 9
मंगळ ग्रह एका राशीत साधारण ४५ दिवस विराजमान असतो. मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड यांसह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे. मंगळ वृश्चिक आणि मेष राशीचा स्वामी आहे. मकर ही त्याची उच्च रास असून कर्क ही त्याची दुर्बल रास आहे.
9 / 9
मंगळाच्या वृषभ प्रवेशाने प्रतिकूल मानला गेलेला अंगारक योगाची समाप्त होत असला तरी, एक दुर्मिळ योग घडेल. ज्यामुळे नवीन संकटे येऊ शकतील. काही अप्रिय घटनााही घडू शकतात. वृषभ राशीतील मंगळाचे संक्रमण संपूर्ण देशात अनेक बदल घडवून आणेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य