शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळाचे गोचर: पुढील ६८ दिवस ‘या’ राशींना मंगलमय काळ; कोणासाठी ठरेल अमंगल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 9:34 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात अन्य ग्रहांसह मेष राशीचे स्वामित्व असलेल्या मंगळ ग्रहाचे गोचर होत आहे. मंगळाचा राशीबदल महत्त्वाचा मानला गेला आहे. मंगळ ग्रह आता शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत विराजमान होत आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत मंगळ वृषभ राशीत विराजमान असेल. (mars transit in taurus august 2022)
2 / 15
मंगळ ग्रह एका राशीत साधारण ४५ दिवस विराजमान असतो. मात्र, वृषभ राशीत तो पुढील ६८ दिवसांपर्यंत असणार आहे. मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड यांसह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे. मंगळ वृश्चिक आणि मेष राशीचा स्वामी आहे. मकर ही त्याची उच्च रास असून कर्क ही त्याची दुर्बल रास आहे. (mangal gochar in vrishabha rashi august 2022)
3 / 15
मंगळाच्या वृषभ प्रवेशाने प्रतिकूल मानला गेलेला अंगारक योगाची समाप्त होत असला तरी, एक दुर्मिळ योग घडेल. ज्यामुळे नवीन संकटे येऊ शकतील. काही अप्रिय घटनााही घडू शकतात. वृषभ राशीतील मंगळाचे संक्रमण संपूर्ण देशात अनेक बदल घडवून आणेल, असे सांगितले जात आहे. मंगळाचे गोचर सर्वच राशींवर प्रभाव टाकणारे असू शकेल. तुमच्या राशीवर मंगळाच्या वृषभ प्रवेशाचा नेमका कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत तुमच्या बोलण्यात कटुता येऊ देऊ नका. क्रीडा क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. मुलांची प्रगती होईल, नशीबही चांगले राहील. नशीब वाढेल तसेच तुम्हाला धन कमावण्याच्या संधी मिळतील, अनेकांना नोकरीत प्रमोशन मिळेल, भाषेवर संयम ठेवा, नीतिमत्ता शुद्ध ठेवा. पोटात त्रास होऊ शकतो. संयम ठेवा. शक्य असेल तर नियमितपणे दुर्गा देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत.
5 / 15
वृषभ राशीत मंगळाच्या आगमनाने या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. सामर्थ्य वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. आत्मविश्वास वाढू शकेल. गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ ठरू शकेल. विद्यार्थ्यांनाही यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय चांगला होईल. शक्य असेल तर दररोज सकाळी भगवान कार्तिकेयची पूजा करावी.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकेल. तुमचे खर्च वाढू शकतात. कर्जाचे अडकलेले काम पूर्णत्वास जाऊ शकेल. वादविवादापासून दूर राहावे. विनाकारण भांडणात अडकणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग बनू शकतात. शक्य असेल तर मंगळवारी कोणत्याही मंदिरात दान करावे, फायदा होऊ शकेल. मंगळवारी हनुमानजींची पूजा करून मिठाई अर्पण करावी.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन लाभदायक ठरू शकेल. नोकरदारांची पदोन्नती होऊ शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. एखादे सरकारी काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर तेही पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीसारखीच चांगली राहील. कर्क राशीसाठी हे संक्रमण खूप शुभ ठरेल. कामातून पैसे मिळत राहतील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद उपयुक्त ठरू शकतील.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला मालमत्तेचा फायदा होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकेल. यामुळे खूप चांगले परिणाम मिळतील. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही कोणतेही मोठे काम सुरू करू शकता, तुम्ही गुंतवणूक करू शकता, तुम्हाला त्यात यश मिळेल. हे संक्रमण तुम्हाला शुभफळ देऊ शकेल. शक्य असेल तर दररोज हनुमान चालिसाचा पाठ करावे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकेल. मात्र, तुमच्यासाठी विचार करून गुंतवणूक करावी. सल्लामसलत न करता निर्णय घेऊ नका. योग्य सल्ला उपयुक्त ठरू शकेल. घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. अनावश्यक प्रवासाला जाऊ नका, येथे तुम्हाला खूप खर्च करावा लागेल. शक्य असेल तर नियमितपणे देवी लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करा.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन सकारात्मक ठरू शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल. अचानक धनलाभ होऊ शकेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील आणि सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना राहील. तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन अनुकूल ठरू शकेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैयक्तिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला उत्साही वाटेल परंतु, तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. शक्य असेल, तर दररोज हनुमानाष्टक स्रोताचे पठण करावे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींवर मंगळाचे राशीपरिवर्तन उत्तम संधींचे ठरू शकेल. तुमचा पगार वाढू शकेल. तुमची कामगिरी उत्तम राहू शकेल. आगामी काळात चांगली बातमी मिळू शकते. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकाल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल आणि त्यांच्या शिक्षणात किंवा कार्यक्षेत्रात सतत वाढ होईल. शक्य असल्यास गरजूंना दान करावे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन ऊर्जावान बनवेल. अशा परिस्थितीत, आपल्या उर्जेचा योग्य दिशेने वापर करणे फलदायी ठरेल. अशा वेळी नोकरदारांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान तुम्ही तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, या काळात त्यांचे तुमच्याशी असलेले वागणे खूप बदलू शकते. शक्य असल्यास लाल रंगाच्या वस्त्रांचे दान करावे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन सकारात्मक ठरू शकेल. आगामी काळात मान आणि सन्मान वृद्धिंगत होऊ शकेल. जमिनीशी संबंधित बाबी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि कार्यक्षेत्रात उत्साह व पराक्रम वाढेल. नवीन ऊर्जा तुमच्या नात्याला अधिक बळ देईल. नवीन वाहन देण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. शक्य असेल तर नियमितपणे बजरंग बाण पठण करावे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन भाग्यकारक ठरू शकेल. या कालावधीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मंगळ तुम्हाला चांगले फळ देईल. मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी सर्व प्रकारे शुभ राहील. मंगळ शुक्राच्या राशीत बसला आहे. पुढील ६ महिने ही स्थिती तुमच्यासोबत राहील. कौटुंबिक संबंधही चांगले राहतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य