शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 5:06 AM

1 / 15
ऑगस्ट महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सिंह राशीत विराजमान झाला आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रहाने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे. सुमारे ४५ दिवस मंगळाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 15
मंगळाचा कन्या राशीतील प्रवेश महत्त्वाचा मानला गेला आहे. यानंतर आता १८ ऑक्टोबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर मंगळ ग्रहापासून कुंभ राशीतील शनी सहाव्या स्थानी असेल. तर मेष राशीत असलेला गुरु ग्रह आठव्या स्थानी असेल.
3 / 15
हा एक विचित्र योग मानला गेला आहे. मंगळाचा कन्या राशीतील प्रवेश काही राशींसाठी उत्तम मानला गेला आहे. तर काही राशींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? तुमची रास कोणती? मेष ते मीन या सर्व राशींवर मंगळ गोचराचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणीही अनेक बदल दिसू शकतात किंवा कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागेल किंवा परदेशात जावे लागेल. खर्चात वाढ होऊ शकेल. स्वभाव आक्रमक होऊ शकतो. इतरांच्या नजरेत तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते.
5 / 15
वृषभ: हा कालावधी संमिश्र परिणामकारक ठरू शकेल. आरोग्याबाबत जागरुक राहण्याचा इशारा देते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेताना योग आणि व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच, प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असू शकते.
6 / 15
मिथुन: मंगळाचा कन्या प्रवेश सामान्य परिणामकारक ठरू शकेल. मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. भविष्यात नफा होऊ शकेल. घरगुती जीवनात चढ-उतार येऊ शकतो. आईसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकेल. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात.
7 / 15
कर्क: मंगळाचे गोचर शुभ ठरू शकेल. आगामी काळ अनुकूल ठरेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. उत्साही असाल आणि संभाषण संयमित ठेवाल. वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
8 / 15
सिंह: अचानक अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवास करताना काळजीपूर्वक वाहन चालवा. जोडीदारासोबत मालमत्ता किंवा संपत्ती वाढवू शकता, दोघांच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकता.
9 / 15
कन्या: सकारात्मकता अनुभवायला मिळेल. डॉक्टर होण्यासाठी प्रॅक्टिस करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल राहील. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगली स्थिती सिद्ध होऊ शकेल. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.
10 / 15
तूळ: मंगळाचे गोचर संमिश्र ठरू शकेल. एकीकडे खर्चात वाढ होत असली तरी अन्य मार्गातून खूप फायदाही कमावू शकाल. मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे किंवा पैशाचे व्यवहार करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
11 / 15
वृश्चिक: मंगळाचे गोचर अनुकूल राहील. या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील, काही नवीन लोकांशी संपर्क स्थापित कराल. काकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पगार वाढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
12 / 15
धनु: व्यावसायिक जीवनात फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगले सिद्ध होईल. परदेशातून चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमातही प्रवेश घेऊ शकतात, जो भविष्यात खूप फायदेशीर ठरेल.
13 / 15
मकर: तुमचे वर्तन शिक्षक आणि वडिलांसाठी दुःखदायक ठरू शकेल. धार्मिक कार्यांकडे कल वाढू शकेल. होम-हवन, सत्यनारायण कथा, तीर्थयात्रा किंवा दान यासारख्या कार्यांवर पैसे खर्च करू शकता. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
14 / 15
कुंभ: तुमची गुंतवणूक आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावध राहावे लागेल. तर दुसरीकडे, या कालावधीत आधी केलेल्या कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणुकीचे मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात.
15 / 15
मीन: वैवाहिक जीवनासाठी संक्रमण अनुकूल दिसत नाही. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बचत करता येणार नाही. विनाकारण होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशल