शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

त्रिग्रही योग: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक काळ; काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:10 PM

1 / 10
आताच्या घडीला मीन राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. मीन राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पति आणि शुक्र विराजमान असून, नवग्रहांचा सेनापती मंगळ या राशीत प्रवेश करणार आहे. १७ मे रोजी होणाऱ्या मंगळाच्या प्रवेशामुळे मीन राशीत तीन ग्रह असतील. (mars transit pisces 2022)
2 / 10
ज्योतिषीय दृष्टिकोनातून मे महिना विशेष आहे. मंगळ हा आक्रमकपणा, पराक्रम, क्रोध यांचा कारक मानला जातो. मीन राशीतील मंगळ प्रवेशामुळे या राशीत मंगळ, शुक्र आणि गुरु या तीन ग्रहांचा योग जुळून येत आहे. या तीनही ग्रहांचा योग काही राशीच्या व्यक्तींसाठी समस्याकारक मानला जात आहे. (trigrahi yog meen rashi 2022)
3 / 10
मीन राशीतील त्रिग्रही योगाचा नेमक्या कोणत्या राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, काय करणे उपयुक्त ठरू शकेल, ते जाणून घेऊया... (mangal gochar in meen rashi 2022)
4 / 10
मंगळाचा मीन प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकतो. दिवस काहीसे आळसावलेले जाऊ शकतील. चिडचिड वाढू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे उपयुक्त ठरू शकेल. कार्यालयात, कार्यक्षेत्रात लक्षपूर्वक काम करावे. हितशत्रूंपासून सावध राहावे.
5 / 10
मंगळाचा मीन प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना अडचणीकारक ठरू शकतो. नकारात्मकता वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. त्रागा वाढू शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगून, योग्य विचारांती निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकेल.
6 / 10
मंगळाचा मीन प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण नकारात्मक होऊ शकते. वाद होऊ शकतात. गैरसमज वाढणार नाहीत, याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. वडिलांशी मतभेद होऊ शकतात. कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सावधगिरी बाळगावी. नोकरदारांना काही बदलांना सामोरे जावे लागू शकेल. कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकेल.
7 / 10
मंगळाचा मीन प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. दाम्पत्य जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींशी मतभेद होऊ शकतात. त्याचा परिणाम नातेसंबंधावर होऊ न देणे उपयुक्त ठरू शकेल. चिडचिड वाढू शकेल. प्रवासात योग्य काळजी घ्यावी.
8 / 10
मंगळाचा मीन प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. अनेक बाबतीत मतभेदही होऊ शकतात. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
9 / 10
मंगळाचा मीन प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींना खर्चकारक ठरू शकेल. आर्थिक स्थितीबाबत सतर्क राहावे. खर्चात वाढ होऊ शकते. पैशांचे नियोजन योग्य पद्धतीने करणे उपयुक्त ठरू शकेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. डोळ्याचे विकार त्रस्त करू शकतात, असे सांगितले जात आहे.
10 / 10
मंगळाचा मीन राशीत होणारा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. चिडचिड वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे. वाणीवर संयम ठेवावा. आपले बोलणे समोरच्यांना पटेलच, असे नाही. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. मात्र, या कालावधीत काही यशकारक घटना घडू शकतात. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य