शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ ऑगस्टपासून ५ राशींना मंगलमय काळ! नशिबाची साथ, धनलाभाचे अपार योग; सुख-समृद्धी लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:08 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टचा महिना महत्त्वाचा मानला जात आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह सिंह राशीत विराजमान झाल्यानंतर लगेचच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे. आक्रमक, उग्र मानला गेलेल्या मंगळाचे राशी गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले गेले आहे.
2 / 9
१८ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करत आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. मंगळ आणि बुधाचे एकमेकांशी असलेले संबंध संमिश्र मानले जातात. मंगळाचा कन्या राशीत होत असलेला प्रवेश ५ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ लाभाचा मानला गेला आहे.
3 / 9
आर्थिक आघाडी, नोकरी, बिझनेस, शिक्षण, करिअर या आघाडींवर मंगळाचा कन्या प्रवेश कोणत्या ५ राशींना सकारात्मक ठरू शकेल? धनलाभाच्या संधी मिळू शकतील का? जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कन्या प्रवेश खूप शुभ ठरू शकेल. या काळात शत्रूंवर पूर्णपणे वर्चस्व गाजवाल. यश मिळेल. मंगळाच्या प्रभावाने आक्रमक होऊ शकता. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने गोष्टी हाताळा.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कन्या प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे दिसतील. या काळात व्यवसाय खूप चांगला होईल. कारकीर्द हवी तशी प्रगती करेल. काही प्रकरणांमुळे घरातील वातावरण थोडे विस्कळीत होऊ शकते. त्याच वेळी, जे घरापासून दूर राहतात ते या काळात त्यांच्या पालकांकडे जाऊ शकतात.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. अभ्यासासाठी लाभदायक ठरेल. एखाद्या मंत्र्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटू शकता. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी विजयी होऊ शकतात. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवणार नाहीत. कोणत्याही प्रकारे नुकसान करू शकणार नाही.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी मित्र बनू शकतात. ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना यश मिळू शकते. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कन्या प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळू शकतील. करिअर चांगले होईल. नोकरीत असलेल्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आणि ऊर्जा दिसेल. आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामामुळे कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकणार नाही.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य