Men of 'these' zodiac sign have magnetic attraction; No worries about finding a mate!
'या' राशीच्या पुरुषांमध्ये असते चुंबकीय आकर्षण; म्हणूनच नसते जोडीदार मिळवण्याची चिंता! By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 4:39 PM1 / 6काही लोकांचे व्यक्तिमत्त्व असे असते की ते कोणाशी बोलायला गेले नाहीत तरी लोक आपणहून त्यांची दखल घेतात. स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाळतात. अशा पुरुषांना जोडीदार मिळवण्याची अजिबात चिंता नसते. एका चित्रपटात म्हटल्याप्रमाणे 'आज पूजा तो कल कोई दुजा' असे लोक सदासुखी असतात. हा त्यांचा राशी गुण असतो की स्वभावगुण ते पाहूया आणि आपली आणि त्यांची रास एकसारखी नसली, तरी त्यांच्या राशीचे गुण घेण्याचा प्रयत्न करूया. 2 / 6या राशीचे पुरुष काहीसे गर्विष्ठ असतात. प्रेमात ते कधी पुढाकार घेत नाहीत, पण यांचे दैव बलवत्तर म्हणून मुली आपणहून यांच्या मागे लागतात. ते सगळ्यांशी मिळून जुळून राहतील पण एकीवरही जीवापाड प्रेम करतीलच असे नाही! अर्थात काही अपवाद वगळता हे स्वभावगुण दिसू शकतील. 3 / 6या राशीची मुले आकर्षक असतात. ते कोणाच्या भावनांशी खेळत नाहीत परंतु मुलीच त्यांच्यात गुंतत जातात. मात्र ते जिच्याशी नाते जोडतात तिच्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहतात. असे म्हणता येईल की या राशीचे पुरुष चांगले जीवनसाथी सिद्ध होतात.4 / 6 सिंह राशीच्या पुरुषांमध्ये बाणेदारपणा असतो. त्यांचे बोलणे रुक्ष वाटते. तरीदेखील त्यांच्या रुबाबावर मुली भाळतात. त्यांची ऐट मुलींवर छाप पडण्यास पुरेशी असते. प्रेमाच्या बाबतीत ते खूप चिकित्सकपणे जोडीदार निवडतात आणि दीर्घकाळ नाते निभावतात. प्रामाणिकपणे साथ देतात. 5 / 6 या राशीचे पुरुष उगीच कुणाच्याही मागे लागत नाहीत. त्यांना जी व्यक्ती आवडते तिला गोड बोलून, गोड वागून, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवून आपलेसे करते. त्यामुळे जी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडते ती आपणहून त्यांना मागणी घालते आणि त्यांचा आयुष्यभराचा जोडीदाराचा प्रश्न सोडवते. 6 / 6तूळ राशीचे पुरुष आकर्षक असतात. त्यांचा आत्मविश्वास, बोलण्याची शैली कुणावरही सहज प्रभाव पाडते. त्यामुळे आपसूकच महिला वर्ग त्यांच्याकडे आकृष्ट होतो आणि त्यांचा जोडीदाराचा प्रश्न आपोआप सुटतो. आणखी वाचा Subscribe to Notifications