शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वक्री बुध अस्तंगत: ८ राशींनी अखंड सावध राहावे, कामावर लक्ष द्यावे; धनहानी योग, संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 7:07 AM

1 / 12
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला विद्यमान स्थितीत मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे. मेष राशीत नवग्रहांचा गुरू बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रहही आहे. बुध आणि गुरु ग्रहाचा युती योग जुळून आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह वक्री आणि अस्तंगत होणार आहे.
2 / 12
०२ एप्रिल रोजी बुध ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे. तर ०४ एप्रिल रोजी वक्री झालेला बुध ग्रह मेष राशीत अस्तंगत होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाच्या या स्थितीला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होणे, असे म्हटले जाते. ०९ एप्रिल रोजी अस्तंगत असलेला बुध वक्री चलनाने मीन राशीत प्रवेश करणार आहे.
3 / 12
बुध ग्रहाच्या वक्री आणि अस्तंगत या स्थितीचा काही राशींवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. विशेषतः हा प्रभाव करिअर, आर्थिक आघाडी आणि व्यवसायावर पाहायला मिळू शकतो, असे म्हणतात. ८ राशींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. बुध ग्रहाने वक्री चलनाने मीन राशीत प्रवेश केल्यावर परिस्थितीत बदल होऊ शकते, असे म्हटले जाते. मेष राशीत वक्री आणि अस्तंगत होत असलेल्या बुधाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकतो, ते जाणून घ्या...
4 / 12
मेष: काही समस्या निर्माण होऊ शकतात. निष्काळजीपणामुळे नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरदारांना सावधगिरीने काम करावे लागेल. अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. नोकरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. धनहानी होऊ शकते. कामावर आणि घरात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक वेळा नीट विचार करावा लागेल.
5 / 12
वृषभ: अखंड सावध राहावे लागेल. कोणाशी वाद होऊ शकतो. करिअरमध्ये मोठ्या संयमाने काम करावे लागेल. अनावश्यक खर्च वाढू शकतात. अचानक खर्च वाढल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नात्यात काही तणाव असू शकतो.
6 / 12
मिथुन: करिअरमध्ये अनेक गोष्टी नकारात्मक वाटू शकतील. काम करावेसे वाटणार नाही. नोकरीसंबंधी अनेक अनावश्यक विचार तुमच्या मनात येऊ शकतात. आत्मविश्वासाची कमतरता असू शकेल. कामावर परिणाम होईल. निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात.
7 / 12
कर्क: करिअरवर आणि कामाच्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. नोकरदारांना कामात रस वाटणार नाही. व्यवसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाची दाद मिळणार नाही. मनात निराशेची भावना राहील. कामात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल. काम अतिशय संथ गतीने होईल. पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल.
8 / 12
कन्या: कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. कामात चूक होऊ शकते. कामाच्या जबाबदारीमुळे तणाव जाणवू शकेल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधीचा फायदा घेता येईलच असे नाही. निराशेतून बाहेर पडून सकारात्मक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
9 / 12
वृश्चिक: कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्याने तुमचा ताण वाढू शकतो. केलेले काम पटेलच असे नाही. नोकरी सोडण्याचा विचार मनात येऊ शकतो. कामाबद्दल काही लोक टीका करू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. परंतु व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे.
10 / 12
धनु: करिअरशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम करत राहा. कामात अनास्था वाटू शकते. सहकाऱ्यांशी भांडण होऊ शकते. धीर धरा. आत्मविश्वास कायम ठेवला तर करिअर किंवा कामाच्या ठिकाणी प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकता.
11 / 12
मकर: करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. नवीन नोकरी शोधण्याचा निर्णय घेऊ शकाल. हुशारीने काम केले तर काळजी करण्याची गरज नाही. विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्यक्षेत्रात स्थिर राहू शकाल. करिअरशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य