Budh Gochar 2025: ४ जानेवारीला ४ राशींना लागणार लॉटरी; नववर्षातील पहिले बुध गोचर ठरणार शुभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:39 IST
1 / 7शास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, वाणी आणि तर्काचे कारक असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार जोपर्यंत बुध ग्रहाचे पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मनुष्य जीवनात यश मिळवू शकत नाही. जेव्हा कुंडलीत बुध ग्रह योग्य स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला यश मिळते, प्रगती होते, आर्थिक चित्र पालटते. परंतु जर तो कमकुवत असेल तर व्यक्तीला नुकसान आणि निराशेचा सामना करावा लागतो. बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात जलद संक्रमण करणरा ग्रह देखील आहे. 2 / 7अपेक्षांनी भरलेले नवीन वर्ष नुकतेच सुरु झाले आहे. यासोबतच वर्षातील पहिले संक्रमणही ४ जानेवारी रोजी होणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, यामुळे ४ राशींचा भाग्योदय होणार असे म्हटले जात आहे. बुध गोचरबद्दल अधिक माहिती घेऊ आणि त्या चार राशी कोणत्या तेही जाणून घेऊ. 3 / 7दर अडीच दिवसांनी त्यांची राशी बदलतात. हे संक्रमण सर्व १२ राशींवर परिणाम करते. २०२५ वर्षातील ग्रहांचे हे पहिले संक्रमण असेल. ज्योतिषांच्या मते बुध महाराज ४ जानेवारीला सकाळी ११.५५ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करतील ज्यामुळे पुढील ४ राशींना लाभ होईल. 4 / 7जे लोक दीर्घ आजारांनी त्रस्त आहेत त्यांना ४ जानेवारीनंतर यापासून आराम मिळू लागेल. जर तुम्ही व्यापार किंवा शेअर मार्केटचे काम करत असाल तर बुधाच्या संक्रमणानंतर तुम्हाला नफा मिळू लागेल. जे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी असमाधानी आहेत त्यांना नवीन नोकरी मिळवण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मुलाची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही समाधानी व्हाल. हातून शुभ कार्य घडेल. 5 / 7बुध गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. तुमच्या घरात मौल्यवान वस्तू येऊ शकतात, ज्यामुळे सुख-सुविधा वाढतील. थंडी असूनही तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि तुमचे आरोग्य तुम्हाला साथ देईल. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. 6 / 7वर्षातील पहिले बुध संक्रमण या राशीच्या लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढवणारे सिद्ध होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे तुमचे बॉस आणि तुमचे सर्व सहकारी कौतुक करतील. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल, जिथे तुमचा सन्मान होईल. तुमच्या उत्तम संवादशैलीच्या मदतीने तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या तोट्यात चाललेल्या व्यवसायाला अचानक गती मिळेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.7 / 7ग्रहांचा राजकुमार बुध तुमच्यासाठी प्रचंड आर्थिक लाभ घेऊन येत आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल. ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे त्यांना हळूहळू कर्जातून दिलासा मिळू लागेल. कामाच्या संदर्भात लांबच्या सहलींवर जावे लागेल, जिथे तुम्हाला अनेक लोक भेटतील. त्या भेटीचा लाभ होईल आणि जीवनात आनंदी आनंद वातावरण राहील.