शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधचा मकर प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी नववर्षाची सुरुवात होईल दमदार; तीन महिने लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 2:20 PM

1 / 9
सन २०२१ ची आता सांगता होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला जाणार बुध ग्रह २९ डिसेंबर रोजी गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. (mercury transit capricorn 2021)
2 / 9
सन २०२१ मधील हे शेवटचे राशीसंक्रमण असेल, असे सांगितले जात आहे. बुधचा मकर राशीतील मुक्काम तब्बल तीन महिने असणार आहे. कारण १४ जानेवारी २०२२ रोजी बुध याच मकर राशीत वक्री होणार आहे आणि ४ फेब्रुवारी २०२२ ला मार्गी होणार आहे. (budh in makar rashi 2021)
3 / 9
मकर राशीत मार्गी झाल्यानंतर ६ मार्च २०२२ रोजी बुध राशीबदल करून कुंभ राशीत विराजमान होणार आहे. आताच्या घडीला मकर राशीत शुक्र आणि शनी विराजमान आहेत. बुधचे हे राशीसंक्रमण सर्वच राशींवर प्रभाव पाडणारे ठरणार आहे.
4 / 9
मात्र, सर्व राशींपैकी ५ राशी अशा आहेत, ज्यांना बुधचे राशीपरिवर्तन खूपच शुभ ठरू शकेल. सन २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात सुखकारक आणि लाभप्रद होऊ शकेल. एवढेच नव्हे, तर फायदेशीर काळ तीन महिन्यांचा असेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींसाठी हा कालावधी मंगलमय असेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
बुधचा मकर राशीत होत असलेला प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभप्रद ठरू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचा मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकेल. सृजनशील व्यक्तींची मिळकत वाढ शकेल. नवीन व्यवसाय, व्यापार सुरू करण्यासाठी आगामी काळ उत्तम ठरू शकेल. तसेच अकाऊंट्स, मीडिया, बँकिंग आणि लेखन क्षेत्रातील व्यक्तींना हा कालावधी अनुकूल ठरू शकले. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा चांगले सहकार्य मिळेल, असे सांगितले जात आहे.
6 / 9
बुधचा मकर राशीत होत असलेला प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक ठरू शकतो. प्रवासाचे योग जुळून येतील. तसेच त्यातून काही ना काही लाभ मिळू शकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना हा कालावधी दमदार ठरू शकेल. मात्र, मिळणाऱ्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील.
7 / 9
बुधचा मकर राशीत होत असलेला प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. गुंतवणुकीसाठी चांगला कालावधी. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरू शकेल. व्यापार, व्यवसाय, उद्योगातून उत्तम नफा मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक आघाडीवरही आगामी काळ सकारात्मक राहू शकेल.
8 / 9
बुधचा मकर राशीत होत असलेला प्रवेश याच राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. बुद्धी आणि कौशल्याचा योग्य व पूरेपूर वापर करून कार्यक्षेत्रात यश तसेच प्रगती साध्य करू शकाल. आर्थिक आघाडीवर आगामी काळ चांगला राहू शकेल. चांगले वर्तन, वाणी यांमुळे समाजात मान, सन्मान प्राप्त होऊ शकेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.
9 / 9
बुधचा मकर राशीत होत असलेला प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना सुखदायक ठरू शकेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. मन प्रसन्न राहू शकेल. मुलांच्या यशामुळे समाधान मिळू शकेल. अन्य स्रोतातून चांगली कमाई होऊ शकेल. कार्यक्षेत्रात लक्षपूर्वक काम करणे हिताचे ठरेल. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य