शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budh Asta 2023: बुध अस्तंगत: ‘या’ ६ राशींना धनवृद्धीचे उत्तम योग, महिनाभर लाभच लाभ; कुंभ प्रवेश शुभ ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 1:15 PM

1 / 15
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध शनीच्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मार्च महिन्यात बुध दोनवेळा रास बदलणार आहे. कुंभ राशीतून मार्च महिन्यात बुध गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. याच महिन्याच्या शेवटी बुध मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. (mercury transit combust in aquarius 2023)
2 / 15
विशेष म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करतानाच बुधचा अस्त होईल. आताच्या घडीला कुंभ राशीत सूर्य आणि शनी विराजमान आहेत. सूर्य आणि बुध एकमेकांपासून जवळच्या अंशात येत असल्यामुळे सूर्याच्या प्रभावामुळे बुध दिसेनासा होईल. यालाच बुध अस्तंगत होणे म्हटले जाते. सुमारे महिनाभर बुध अस्तंगत असेल. (budh asta in kumbha rashi gochar 2023)
3 / 15
महत्त्वाची बाब म्हणजे सध्या शनीही कुंभ राशीत अस्तंगत आहे. बुधच्या कुंभ प्रवेशाचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल, कोणत्या राशींना आगामी काळ धनलाभ, आर्थिक प्रगती, यशकारक ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी संमिश्र काळात काय करू नये, ते जाणून घेऊया... (budh asta gochar in kumbha upay and prabhav 2023)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. मेहनतीचे फळ मिळेल. प्रेम जीवन थोडे तणावपूर्ण राहू शकते. बुध ग्रहाशी संबंधित हा उपाय तुम्ही करू शकता. तसेच भगवान विष्णूच्या श्री वामन स्वरुपाची पूजा आणि आराधना करणे लाभदायक ठरू शकेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नोकरीत स्थिरता मिळू शकेल. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा चांगली राहील. परंतु, महिनाभर बुध ग्रहाशी संबंधित उपाय केल्याने तुम्हाला अधिक फळ मिळेल. शक्य असल्यास गोमातेला नियमितपणे अन्नदान करावे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांनी थोडा संयम ठेवावा. शक्य असल्यास सुमारे महिनाभर ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमच्याविरुद्ध कटकारस्थान केले जाऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. प्रत्येक आव्हानाला जिद्दीने सामोरे जाल. प्रमोशनच्या चांगल्या संधी मिळू शकतील. शक्य असल्यास आगामी महिनाभर ॐ नमो नारायण या मंत्राचा २१ वेळा दररोज जप करणे लाभदायक ठरू शकेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कौटुंबिक जीवन थोडे तणावपूर्ण राहू शकते. बोलताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास नियमितपणे दर बुधवारी श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रवण करावे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी वर्तन योग्य ठेवावे. काम करताना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मालमत्तेबाबत कोणाशीही वाद होऊ शकतो. तसेच या काळात आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. या कालावधीत श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण किंवा श्रवण लाभदायक ठरू शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षमतेत वाढू होऊ शकेल. या काळात पैसे मिळण्याचीही चांगली शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी काळ खूप चांगला जाणार आहे. शक्य असल्यास बुधवारी गरजूंना वस्त्रदान करा.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश संमिश्र परिणाम देणारा ठरू शकेल. नोकरदारांसाठी हा काळ चढ-उतारांचा ठरू शकेल. घरगुती खर्च वाढेल. आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे. शक्य असल्यास नियमितपणे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. संवाद कौशल्य चांगले होऊ शकेल. कामाचा भार पडेल. मीडियाशी संबंधित लोकांना फारसा अनुकूल नाही. शक्य असल्यास नियमितपणे बुधाच्या बीजमंत्राचा यथाशक्ती जप करावा.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. बोलण्यातील माधुर्य वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुरू असलेले वाद मिटतील. यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास दुर्गा चालीसाचे पठण किंवा श्रवण करावे.
14 / 15
कुंभ राशीत प्रवेश करतानाच बुध अस्तंगत होत आहे. या राशीत सूर्य आणि शनी विराजमान असून, शनीही अस्तंगत आहे. कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ मध्यम फलदायी असेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांसाठी यशकारक काळ. लव्ह लाईफ बाबतीत चांगला काळ जाणार आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतील.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. खर्चात वाढ होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जात आहे. कामाचा ताणही खूप जास्त असेल. शक्य असल्यास बुधवारी श्री राधे-कृष्णाची पूजा करावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य