शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधाचा कर्क प्रवेश: ६ राशींना अनेक लाभ, गुंतवणुकीतून नफा; ६ राशींवर कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 7:07 AM

1 / 15
उत्तम बुद्धी, तर्कक्षमता यांचा कारक मानला गेलेला बुध ०८ जुलै रोजी कर्क राशीत विराजमान झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला शुक्राने सिंह राशीत प्रवेश केला आहे. यानंतर लगेचच बुध ग्रह कर्क राशीत विराजमान झाला आहे. चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीतील बुधाचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
2 / 15
विशेष म्हणजे २४ जुलै रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, काही दिवसांनी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होत आहे. यामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. बुधाच्या कर्क राशीतील प्रवेशाने करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर प्रभाव पडू शकेल.
3 / 15
बुधाच्या या राशी संक्रमणाच्या प्रभावामुळे अनेक राशींना नशिबाची अन् भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. काही राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, यश प्राप्त होऊ शकेल. मात्र, काही राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? तुमची रास कोणती? तुमच्या राशीवर कसा असेल बुध गोचराचा प्रभाव? जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आगामी काळ फारसा अनुकूल मानला जात नाही. काही कारणाने तणाव वाढू शकेल. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. करिअरमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीनुसार यश न मिळाल्यास निराश होऊ शकाल. व्यवसायात कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. अन्यथा नुकसान होऊ शकते. चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश लाभदायक ठरू शकेल. उत्साह वाढू शकेल. अनेक सकारात्मक बदल होऊ शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. परदेशातून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. लाभाच्या शुभ संधी मिळू शकतील. काही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कौटुंबिक सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. घरात काही शुभ कार्य होऊ शकतात.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसायावर प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीतही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विनाकारण वाद होऊ शकतात.
7 / 15
कर्क राशीत बुधाचा प्रवेश झाला आहे. या राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर संमिश्र ठरू शकेल. कोणतेही काम करायचे असेल तर खूप विचार करून निर्णय घ्यावा. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांची बदली होऊ शकते. आयुष्यात तणाव वाढू शकतो. लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. वैयक्तिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. हा काळ फारसा अनुकूल नाही. एकाच वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणतेही काम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत खूप सकारात्मक परिणाम मिळाल्याने आनंद होईल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश लाभदायक ठरू शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांच्या मदतीने गरजा पूर्ण होतील. नवीन लोक भेटतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकेल. करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतील. व्यावसायिकांना फायदा मिळू शकेल. कठोर परिश्रमाने पैसा मिळवण्यात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत संबंध चांगले राहतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश शुभ ठरू शकेल. नवीन लोकांशी चांगली भेट होईल. मित्र साथ देतील. भागीदारीत व्यवसाय केल्यास नफा मिळू शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांना पाहून मन प्रसन्न राहील. या काळात पैशाचा वापर हुशारीने कराल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये अचानक काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. मुलांसोबतच्या नात्यात वाद वाढू शकतात. कोणालाही कर्जाऊ किंवा उसने पैसे देऊ नका. अन्यथा पैसे अडकू शकतात.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. लव्ह लाइफवर प्रतिकूल प्रभाव पडू शकेल. काही कारणास्तव इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. या काळात विरोधक त्रास देऊ शकतात. विनाकारण खर्च वाढू शकतात.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कामाबद्दल खूप जागरूक राहावे लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतील. पैसे मिळवण्यात यश मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यापारी पैसा मिळवण्यात यशस्वी होतील. व्यवसाय विस्तारासाठी योजना आखतील.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश शुभ ठरू शकेल. या काळात आर्थिक लाभ मिळू शकतो. काही छोट्या गोष्टी सोडल्या, तर सर्वकाही चांगले होऊ शकेल. व्यावसायिक आघाडीवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. दुसरीकडे, विरोधकांना कडवी झुंज द्यावी लागू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश शुभ ठरू शकेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. करिअरबद्दल समाधानी राहू शकाल. भौतिक इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करू शकतो. कठोर परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त होईल. जीवनात यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य