शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधचा तूळ प्रवेश: तुमच्यावर कसा असेल प्रभाव? ‘या’ ७ राशी लकी, लाभाचा उत्तम काळ; शुभच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 8:08 AM

1 / 15
बुध ग्रह आपले स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी बुधचे राशीपरिवर्तन होत आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत बुध तूळ राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. (mercury transit in libra 2022)
2 / 15
ऑक्टोबर महिन्याची सांगता व्हायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत. देशभरात दिवाळीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतरही काही राशीच्या व्यक्तींना हा काळ लाभदायक ठरू शकेल. कारण २६ ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाचा तूळ राशीत झालेला प्रवेश. १९ नोव्हेंबरनंतर बुध तूळ राशीतून पुढे वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. (budh transit in tula rashi 2022)
3 / 15
तूळ राशीत बुधाच्या प्रवेशाने चार ग्रहांचा अनोखा संयोग तयार होईल. वास्तविक या काळात तूळ राशीमध्ये बुधासोबत सूर्य, शुक्र आणि केतूही असतील. बुधच्या तूळ प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशींना फायदा होईल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, तुमच्यावर या ग्रहस्थितीचा काय प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. एखादा प्रवास करावा लागू शकेल. या प्रवासामुळे अधिकचा खर्च होण्याची शक्यता आहे. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच तुमचे भावंडांसोबतचे नातेही चांगले राहील. शक्य असल्यास बुधवारी दुर्गा देवीला हिरव्या रंगाचा समावेश असलेला चुडा अर्पण करावा.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकेल. घरगुती वस्तूंची खरेदी करू शकाल. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. म्हणूनच सुरुवातीपासूनच तुमचे बजेट बनवण्याचा सल्ला दिला जातो. प्रियकरासह सहलीला जाण्याचाही प्लॅन करू शकता. शक्य असेल तर बुधवार व्रताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करावे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश चिंतामुक्तीचा ठरू शकेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवू शकाल. तुमची कोणतीही जुनी समस्या दूर होऊ शकते. कुटुंबात मान-सन्मानही वाढेल. कामाच्या ठिकाणीही अनेक लाभाच्या संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. व्यर्थ वेळ वाया न घालवण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्य असेल तर, दुर्गा देवीची नियमित पूजा करा. दर बुधवारी तुपाचा दिवा लावावा.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश शुभ ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात शांततापूर्ण वातावरण असेल. घरातील सदस्यांची मदत होऊ शकेल. भरपूर पैसे कमावण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. नोकरदारांचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. तूर्तास कोणालाही पैसे न देण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्य असेल तर, दर बुधवारी श्री दुर्गा चालिसाचे पठण करा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल. भावंडांशी असलेले नाते मजबूत होऊ शकेल. तुमच्या मताला घरात खूप महत्त्व दिले जाईल. कामाच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप चांगला काळ असू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील. नशीबाची उत्तम साथ मिळू शकेल. मात्र, सल्ल्याशिवाय गुंतवणून न करण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्य असेल तर नियमितपणे श्रीविष्णूंचे पूजन करावे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश प्रगतीकारक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुम्ही तुमची कामे वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. तुमचे उत्पन्नही वाढेल. व्यापारी वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. शक्य असेल तर नियमितपणे 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
10 / 15
तूळ राशीत होत असलेले बुध ग्रहाचे आगमन या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. तुम्ही पैसे कमवाल, पण खर्चही जास्त असेल. सध्या कुठेही पैसे गुंतवणे टाळा. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. पण तरीही तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलताना चांगले वागण्याचा सल्ला दिला जातो. शक्य असेल तर गरजुंना अन्न दान, वस्त्र दान करावे.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वाढत्या खर्चामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशांचे मोठे व्यवहार टाळणे उपयुक्त ठरू शकेल. शुभवार्ता मिळू शकेल. नोकरदारांनी विरोधकांपासून सावध राहावे. शक्य असेल तर नियमितपणे दुर्गा देवीच्या मंत्रांचा जप करावा.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश चांगल्या संधींचा ठरू शकेल. जुन्या पैशांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. काही लोकांना त्यांचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्यावर अधिक प्रभावित होतील. तुमचे कौटुंबिक जीवनही शांततेत व्यतीत होईल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रकल्प तुम्ही कार्यान्वित करू शकता. शक्य असेल तर, बुधवारी गणपतीची पूजा करून दूर्वा अर्पण कराव्यात.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. व्यवसायाचा विस्तार करू शकता. कर्ज घेण्याचा निर्णय घेऊ शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. शक्य असेल तर नियमितपणे श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. मुलांशी संबंधित काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. तुमचा वाढता खर्च चिंतेचे कारण ठरू शकतो. भावंडांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. विवाहित व्यक्तींनी या काळात मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. शक्य असेल तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दान करावे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होत असताना तुम्हाला यश मिळेल. पैशाच्या बाबतीत खूप चांगला असेल. आता तुम्ही असे निर्णय घेऊ शकाल जे तुम्ही पैशांअभावी घेऊ शकले नाहीत. आरोग्याबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्य असेल तर, बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा १०८ वेळा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2022