शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधचा धनु प्रवेश: ‘या’ ८ राशींना अत्यंत शुभ-लाभ; सर्वोत्तम काळ, तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 12:45 PM

1 / 15
इंग्रजी वर्षाचा शेवटचा असलेला डिसेंबर महिना अनेकार्थाने चांगला ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात मराठी वर्षातील मार्गशीर्ष असल्याने अनेकविध व्रत-वैकल्ये, सण-उत्सव आहेत. तसेच इंग्रजी नववर्षाची चाहुल अनेकांना लागलेली आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही हा महिना विशेष ठरणारा आहे. (mercury transit in december 2022)
2 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वृश्चिक राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. ०३ डिसेंबर रोजी बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा वाणी, बुद्धिमत्ता आणि संवादाचा कारक मानला जातो. शिक्षक, सल्लागार या व्यवसायाशी संबंधित लोकांना बुधाच्या या संक्रमणाचा विशेष फायदा होणार असल्याचे मानले जाते. (mercury transit in sagittarius december 2022)
3 / 15
बुधच्या धनु गोचराचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. काही राशीच्या लोकांसाठी बुधचा धनु प्रवेश फायदेशीर ठरू शकेल, तर काही लोकांसाठी हे गोचर संमिश्र ठरू शकेल. बुध ग्रहाचा धनु राशीतील प्रवेश तुमच्यासाठी कसा ठरू शकेल, ते जाणून घेऊया... (budh gochar in dhanu rashi 2022)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. वडील आणि लहान भावंडांकडून खूप प्रेम मिळेल. आर्थिकदृष्ट्या हे संक्रमण तुमच्यासाठी चांगले परिणाम देईल. व्यावसायिकांना चांगले करार होऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. शक्य असल्यास तुळशीला दररोज पाणी घालावे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. घरातील सदस्याची तब्येत बिघडू शकते. वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची भीती राहील. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि नातेवाईकांशी चांगले वर्तन ठेवा.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश शुभ ठरू शकेल. या राशीच्या लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जे व्यवसाय करतात त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन जोडीदार मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आपल्या आहाराची काळजी घ्यावी.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही कारणाने मानसिक तणाव येऊ शकतो. उदास वाटू शकते. रक्तदाबाशी समस्या वाढू शकतात. काळजी घ्या. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. कर्ज मिळण्यात काही अडचण येऊ शकतात. संचित संपत्तीत घट होऊ शकते. नातेवाइकांशी जुळवून घ्यावे. तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मित्र किंवा नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी मोठ्या संस्थेत प्रवेश घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळू शकते. शिक्षण आणि जनसंवाद यांसारख्या क्षेत्रांशी निगडित असलेल्यांना यश मिळेल. शक्य असल्यास सरस्वती देवीचे पूजन करावे. शुक्रवारी ५ लाल फुले अर्पण करावी.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश शुभ ठरू शकेल. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करू शकता. वाहन सुख मिळू शकेल. मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटू शकते. यासंदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागू शकेल. शक्य असल्यास दर शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करावी.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आत्मविश्वास कमी होऊ शकेल. जोखीम पत्करून कोणतेही काम करू नका. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. मित्रांशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. कोणाचेही म्हणणे मनावर न घेता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून काम करणे चांगले. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करताना अडचणी येऊ शकतील. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश विशेष ठरू शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. कौटुंबिक संबंध अधिक चांगले होतील. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ येऊ शकेल. प्रियजनांबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते.
12 / 15
धनु राशीत होत असलेले बुधाचे आगमन या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ वार्ता आणणारे ठरू शकेल. आयात-निर्यात क्षेत्राशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ अतिशय चांगला ठरू शकतो. मेडिकलची तयारी करत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शक्य असल्यास नियमितपणे गणेशाची आराधना करा आणि दुर्वा अर्पण करा.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. खर्च खूप वाढतील. नात्यात कटुता येऊ शकते. आर्थिक नुकसान करू शकते. मैत्रिणी किंवा नातेवाईकावर जास्त पैसे खर्च करावे लागतील. आरोग्याबाबत जागरुक राहा. विरोधकांचा प्रभाव अधिक असणार आहे. सावधगिरी बाळगा.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश शुभ ठरू शकेल. तुम्हाला खूप मदत मिळू शकते. विशेषत: मोठा भाऊ आणि मामा यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कारकिर्दीत गेल्या एक वर्षात केलेल्या मेहनतीचा तुम्हाला विशेष लाभ मिळेल. नोकरीसंबंधी कोणतीही उपयुक्त माहिती मिळवू शकता.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा धनु प्रवेश शुभ लाभदायक ठरू शकेल. प्रत्येक बाबतीत लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. काम विस्तारण्याचा विचार करू शकता. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगली माहिती मिळू शकते. वैवाहिक नात्यात गोडवा येईल. कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे नाते अधिक जवळ येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य