शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधाचा सूर्य राशीत प्रवेश: ९ राशींना सर्वोत्तम संधी, अपार यश-प्रगती; दुपटीने लाभ, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:34 AM

1 / 12
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला तसेच बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक बुध ग्रह सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला बुध चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत आहे. १९ जुलै रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 12
बुधासाठी सिंह रास अनुकूल मानली जाते. सिंह राशीतील प्रवेशाने बुधाच्या शुभ प्रभावात वृद्धी पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. तसेच बुधावर मंगळाची आणि शनीची दृष्टी राहणार आहे. याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो.
3 / 12
बुध ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशाने काही राशीच्या लोकांच्या जीवनात सुखद बदल घडू शकतात. अनेक शुभ संधी मिळू शकतात. यश आणि प्रगती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. कोणत्या ९ राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात, ते जाणून घेऊया...
4 / 12
मेष: नोकरीत सुवर्ण संधी मिळतील. संधीचे सोने करण्यासाठी तयार असायला हवे. मोठी प्रगती होऊ शकते. बॉसकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांसाठी हा सुवर्णकाळ असू शकतो. कामाचा विस्तार करू शकतात. वाणीचा प्रभाव वाढेल. शैक्षणिक स्पर्धेत यश संपादन करू शकाल. सरकारी नोकरीत असलेल्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
5 / 12
वृषभ: मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतात. वाणीच्या प्रभावामुळे अनेक कामे पूर्ण होऊ शकतील. संपत्तीतही वाढ होऊ शकेल. इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरणही खूप सकारात्मक राहू शकेल. विक्री, विपणन आणि सल्लामसलत यामध्ये क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना अनुकूल परिणाम देणारे मानले गेले आहे.
6 / 12
मिथुन: करिअरसाठीही हा काळ चांगला राहील. प्रवासात लाभ होईल. नवीन लोक भेटतील, ज्यांचा भविष्यात फायदा होऊ शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतील. काही विशेष यश मिळू शकते.
7 / 12
सिंह: आर्थिक लाभ अपेक्षित आहे. जुन्या गुंतवणूक योजनांमधून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. संधीचे सोने करण्यासाठी सज्ज राहावे. प्रगतीचा वेग वाढू शकेल. निर्णयांचे कौतुक होईल. लोकप्रियता आणि कीर्ती वाढू शकेल. मात्र, कामात गाफील राहू नका.
8 / 12
कन्या: आश्चर्यकारक सुखद बातम्या मिळू शकतात. ज्याची अपेक्षाही केली नसेल. मोठ्या कंपनीत किंवा परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या आणि वाढीव पगाराचा लाभ मिळू शकतो. पैशांचा ओघ कायम राहू शकेल. खर्चांवर नियंत्रण न ठेवल्यास आर्थिक नियोजन ढासळू शकते.
9 / 12
तूळ: नोकरीत कामाचे कौतुक होईल. एखादे बक्षीसही मिळू शकेल. उत्पन्न वाढविण्याचा विचार कराल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकेल. शब्दांला किंमत येईल. नशिबाची साथ लाभेल. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होईल.
10 / 12
वृश्चिक: नवीन नोकरीची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही सुखद बदल होऊ शकतात. प्रगती होऊ शकते. जवळच्या व्यक्तीमुळे मोठे पद किंवा चांगली नोकरी मिळू शकते. व्यावसायिक लोक गोपनीयतेने योजना राबवू शकतात. नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात. कामाचा विस्तार करण्यासाठी नवीन गुंतवणूक किंवा नवीन भागीदार मिळू शकेल.
11 / 12
धनु: परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये लक्ष्य साध्य करू शकाल. बॉसकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यावसायिक भागीदार व्यवसाय पुढे नेण्यात मदत करू शकतील. जमीन खरेदी आणि विक्री करू शकता.
12 / 12
कुंभ: शैक्षणिक स्पर्धांशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकेल. यशप्राप्तीसाठी प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. व्यावसायिक प्रगतीसाठी काळ अनुकूल राहील. बॉसकडून प्रशंसा मिळू शकते. सहकारी प्रभावित होतील. नेटवर्किंगचा पूर्ण फायदा मिळू शकेल. विचार चांगले राहू शकतील.- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य