mercury transit in libra 2021 laxmi narayan yog of budh gochar in tula and impact on all zodiac sign
Mercury Transit in Libra 2021: तूळ राशीत जुळून येतोय शुभ लक्ष्मी नारायण योग; ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना लाभदायक काळ By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 8:09 AM1 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सप्टेंबर महिन्यात ५ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होत आहेत. नवग्रहांचा राजकुमार म्हणून मान्यता असलेला बुध आपले स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान होत आहे. (Budh Gochar Tula 2021)2 / 15बुध ग्रह २२ सप्टेंबर रोजी तूळ राशीत विराजमान होत आहे. या तूळ राशीत आधीपासूनच शुक्र ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र एका राशीत असल्यावर लक्ष्मी नारायण योग जुळून येतो. हा योग अतिशय शुभ, अद्भूत असल्याची मान्यता आहे. (Mercury Transit in Libra 2021)3 / 15बुध ज्ञान, बुद्धी यांचा कारक मानला जातो. तर शुक्र भौतिक सुख, कला, साहित्याचा कारक मानला जातो. याशिवाय बुधवारी बुध ग्रहाचे होणारे राशीपरिवर्तन हे शुभ मानले जाते. बुधचे राशीपरिवर्तन आणि लक्ष्मी नारायण योगाचा सर्व राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव राहील. कोणत्या राशींना हा कालावधी लाभदायक ठरू शकेल, तर कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया... (Laxmi Narayan yog in Tula Rashi 2021)4 / 15मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत शुभवार्ता मिळू शकतील. कामाचा व्याप वाढला, तरी आपली कामगिरी उत्तम राहू शकेल. नवीन जबाबदारी मिळू शकेल. मात्र, कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे आणि संयम, धीराने गोष्टी हाताळाव्यात, असे सांगितले जात आहे. 5 / 15वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कामगिरीत सुधारणा होऊ शकेल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. गैरसमज दूर होतील. समाजातील मान, सन्मान वाढू शकेल. मात्र, खर्चात काही प्रमाणात वाढ संभवते, असे सांगितले जात आहे. 6 / 15मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. धनवृद्धीचे योग संभवतात. या कालावधीत उत्साह आणि उर्जा यामध्ये वाढ होऊ शकेल. मात्र, अतिआत्मविश्वासावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूक करताना सारासार विचार करून करावी, असे सांगितले जात आहे. 7 / 15कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत संयम आणि सबुरीने गोष्टी हाताळणे लाभदायक ठरू शकेल. कोणत्याही वादात पडू नये. वाणीवर नियंत्रण ठेवावे. घरखरेदी किंवा जमिनीतील गुंवतणूक करण्यासाठी अनुकूल काळ असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 15सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. व्यापार वृद्धीसाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग होऊ शकेल. तसेच त्यातून फायदाही मिळू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. मात्र, कोणतीही गंतवणूक करताना सारासार विचार तसेच तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मानसिक ताण कमी होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 9 / 15कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकाल. विद्यार्थ्यांना आगामी काळ यश, प्रगतीकारक ठरू शकेल. व्यवसाय, व्यापार, उद्योगात लाभ संभवतो. मात्र, कुटुंबासाठी खर्चात वाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 10 / 15तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा होत असलेला प्रवेश यशकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील योजना यशस्वी ठरू शकतील. दाम्पत्य जीवन चांगले असेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. मात्र, भावनांना आवर घालावा. व्यापार, व्यवसाय विस्तार करण्याची योजना पुढे ढकलावी, असे सांगितले जात आहे. 11 / 15वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. खर्चात वाढ होऊ शकेल. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. याशिवाय गुंतवणुकीचा निर्णय योग्य विचार करून घेतल्यास लाभ संभवतो. नवीन कौशल्य आत्मसाद करू शकाल. यातून यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 12 / 15धनु राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. भागीदारीतील व्यापार, व्यवसायात प्रगती होऊ शकेल. कोषवृद्धीचे योग आहेत. दाम्पत्य जीवन चांगले राहील. तसेच चिंतामुक्तीचा अनुभव घेऊ शकाल, असे सांगितले जात आहे. 13 / 15मकर राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश प्रगतीकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेल्या योजना मार्गी लागू शकतील. यातून यश, प्रगती साध्य होऊ शकेल. नवीन विचार लाभदायक ठरू शकतील. आपली प्रतिमा सुधारेल. मात्र, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले जात आहे. 14 / 15कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सासरच्या मंडळींशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. दीर्घकालीन गुंतवणूक करताना विचार करावा. उत्पन्न वाढीच्या संधी मिळू शकतील. मात्र, कोणत्याही प्रकारचे गैरसमज होऊ देऊ नयेत, असे सांगितले जात आहे. 15 / 15मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. नोकरदार वर्गाला या कालावधीत काही समस्या, अडचणींचा, चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबतचे गैरसमज टाळावेत. मात्र, विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी शुभ ठरू शकेल. नवीन दिशा मिळेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications