शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ ग्रह गोचर, १ राजयोग: ५ राशींची इच्छापूर्ती, भाग्य-शुभता वृद्धी; पदोन्नती, नफा, धनलाभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:51 AM

1 / 9
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत नवग्रहांपैकी दोन महत्त्वाचे ग्रह राशीगोचर करत आहेत. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करत असून, शुक्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या या गोचरामुळे इंग्रजी वर्षाच्या डिसेंबर महिन्याची सुरुवात काही राशींना चांगली ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 9
शुक्र ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर मालव्य नामक राजयोग जुळून येत आहे. हा एक उत्तम फले देणारा शुभ राजयोग मानला जातो. तर डिसेंबर महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, गुरु हे ग्रह गोचर करणार आहेत.
3 / 9
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या गोचराने कोणत्या राशी लकी ठरू शकतील, आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर तसेच जीवनातील अन्य क्षेत्रांवर या ग्रह गोचराचा प्रभाव कसा असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना कामात अपेक्षित यश मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा लाभ करून घ्यावा. कोणताही मोठा निर्णय घेताना वडिलांची साथ नक्कीच मिळेल. वैवाहिक जीवन आनंदात आणि शांततेत व्यतीत होईल.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. शुभ गोष्टी घडू शकतात. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. समाजात सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ दयाळूपणे वागतील. आवडीचे काम मिळू शकते. वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ आणि लाभदायक ठरू शकेल. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. प्रवासातून अपेक्षित परिणाम मिळू शकेल. आर्थिक बाजू खूप मजबूत असणार आहे. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतील. संचित संपत्तीतही वाढ होईल. गुंतवणुकीचे मोठे फायदे मिळू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ खूप शुभ असणार आहे. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. एवढेच नाही तर नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगली संधी मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. समाजात सन्मान वाढेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना हा काळ शुभ आणि अनुकूल असणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने भावंडांशी सुरू असलेले मतभेद मिटतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. नोकरदारांना काही मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. जे आयात-निर्यातीचे काम करतात त्यांना अनपेक्षितरित्या मोठा नफा मिळू शकतो.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य