शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 1:28 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह सर्वांत मंद गतीचा ग्रह मानला जातो. तर चंद्र सर्वांत जलदगतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. जुलै महिन्यात चंद्राचे भ्रमण अनेक राशींतून होणार आहे. चंद्र आणि अन्य ग्रहांच्या युतीने काही विशेष योग, राजयोग, तर काही प्रतिकूल योग जुळून येत असतात.
2 / 9
जुलै महिन्यात चंद्र आणि मंगळ यांचा युती योग जुळून येत आहे. या योगाला महालक्ष्मी योग म्हटले जाते. महालक्ष्मी योग राजयोगाप्रमाणे फले देतो, असे मानले जाते. काही दिवसांनी मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे.
3 / 9
महालक्ष्मी राजयोगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकेल, असे सांगितले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष: चंद्र मंगळ युतीचा महालक्ष्मी राजयोग लाभदायक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. वैवाहिक जीवनही आनंददायी असेल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरदार लोकांना दिलेली कामे यशस्वी ठरू शकतील. उत्पन्नात वाढू शकेल. तसेच पैशांची बचत करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. प्रयत्न सोडू नका.
5 / 9
मिथुन: महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. उद्योजक म्हणून यशस्वी होऊ शकाल. उत्पन्नात वाढू शकेल. तसेच पैशांची बचत करू शकाल. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकेल. शेअर बाजार, लॉटरीत नफा मिळण्याची शक्यता आहे.
6 / 9
कर्क: महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकते. आगामी काळ काम आणि व्यवसायासाठी चांगला राहू शकेल. नवीन करार होऊ शकतो. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पातळी वाढू शकेल. अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळेल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील.
7 / 9
सिंह: महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. नशिबाची साथ मिळेल. बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पातळी वाढू शकेल.अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आत्मविश्वासात चांगली वाढ होऊ शकेल. प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होऊ शकतील.
8 / 9
तूळ: महालक्ष्मी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. मान आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. सुख-समृद्धी लाभू शकेल. काम आणि व्यवसायात वृद्धी शक्य आहे. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. भागीदारीच्या कामात फायदा होण्याची शक्यता आहे.
9 / 9
धनु: महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वासात चांगली वाढ होऊ शकेल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य