शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 4 राशींच्या लोकांना येतो सर्वात जास्त राग, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण्यासाठी असतात तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:31 IST

1 / 5
प्रत्येकालाच भांडकुदळ लोकांपासून दूर राहायचे असते. या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला अशा 4 राशींसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्या राशींच्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतो (Angry Zodiac Signs). हे लोक रागाच्या भरात समजूनही घेत नाहीत आणि नेहमीच भांडायला तयार राहतात. चला जाणून घेऊया याराशींसंदर्भात...
2 / 5
वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या लोकांना फार पटकन राग येतो. या राशीच्या लोकांना जेव्हा एखाद्याची गोष्ट लागते, तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते. कधीकधी तर ते असेही निर्णय घेतात, की त्या निर्णयांमुळे त्यांच्यावर पश्चातापाचीही वेळ येते. हे लोक आपली चूक असली तरी मान्य करत नाहीत.
3 / 5
मिथुन (Gemini): मिथुन राशीचे लोकही रागीट आणि भांडखोर स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना केव्हा राग येईल हे कुणीच सांगू शकत नाही. जोडीदार, प्रियकर अथवा मित्रांना त्यांच्या रागाचा नेहमीच सामना करावा लागतो. हे लोक छोट्या-छोट्या गोष्टींचाही परवत करतात.
4 / 5
सिंह (Leo): या राशीच्या लोकांना सर्वात जास्त राग येतो. रागाच्या भरात हे लोक अनेकवेळा सर्वच मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक मान्य करत नाहीत. जेव्हा या राशीचे लोक चिडलेले असतील, तेव्हा त्याच्यापासून दूर राहिलेलेच बरे.
5 / 5
कन्या (Virgo): या राशीच्या लोकांनाही फार पटकन राग येतो. हे लोक रागाच्या भरात असे काही करून जातात, की नंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. अनेक वेळा त्यांचा राग धोकादायक ठरतो आणि त्यावर नियत्रण मिळवणे कठीण होते.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष