Nag panchami 2022 Amazing Facts of Snake know how the snakes age and venomousness is decided
नागपंचमीला शिल्लक आहेत फक्त एवढे दिवस; जाणून घ्या, कसं ठरवलं जातं सापाचं वय आणि विषारीपणा By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:21 PM1 / 8नागपंचमी हा सण श्रावन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. यावर्षी हा सण 2 ऑगस्ट 2022 ला, म्हणजेच मंगळवारी साजरा केला जाणार आहे. देश आणि संपूर्ण जगभरात नाग अथवा सापांशी संबंधित अनेक तथ्ये प्रचलित आहेत. तर यानिमित्ताने जाणून घेऊयात सापांशी संबंधित काही खास माहिती...2 / 8सांपांशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये - सापाचे अंडे : सापाचे अंडे पाहूनच, ते नर सापाचे अंडे आहेत, की मादा सापाचे, हे ओळखता येऊ शकते. जे अंडे चमकतात ते नर सापाचे असतात.3 / 8नागीन 6 महिने तिची अंडी उबवते आणि जेव्हा पिल्ले बाहेर येतात, तेव्हा ती अनेक पिल्ले स्वतःच खाऊन टाकते. विशेषतः यातील अशीच पिल्ले वाचात जी नागीनीपासून दूर गेलेल्या अंड्यांतून बाहेर येतात अथवा ज्यांवर नागिनीची नजर पडत नाही.4 / 8साधारणपणे साप पावसाळ्यात गर्भधारणा करतात आणि कार्तिक महिन्यात जास्तीत जास्त अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात.5 / 8अंड्यांतून बाहेर आल्यानंतर 7 दिवसांनंतर सापाचे दात उगवतात आणि 21 दिवसांनंतर, त्यात विषही तयार होते. जर साप विषारी असेल, तर जन्माच्या 25 दिवसांनंतर, तो कुणाचाही जीव घेऊ शकतो.6 / 8शास्त्रीय माहितीनुसार, सापाचे वय 100 वर्षांहूनही अधिक असते. हे वय जास्तीत जास्त 120 वर्ष एवढे असते. मात्र, सापाच्या फार कमी जाती एवढी वर्ष जगू शकतात. 7 / 8सापाचे वय आणि त्याचा विषारीपणा हा त्याच्या जन्मावरून ठरवला जातो. म्हणजेच, जे साप वेळेपूर्वीच अंड्यातून बाहेर येतात, त्यांचे वय केवळ 40 ते 45 वर्षे राहते. तसेच ते कमी विषारी आणि कमी प्रभावी असते. असे साप डरपोकही असतात.8 / 8(टीप : येथे देण्यात आलेली माहिती, ही सर्वसामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.) आणखी वाचा Subscribe to Notifications