The nature of your zodiac sign causes failure; It is desirable to change it in time!
अपयशाला कारणीभूत ठरतो आपल्या राशीचा स्वभाव; त्यात वेळीच बदल करणे ठरते इष्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 11:50 AM1 / 12तुमच्या आवडी निवडी समयपरत्वे बदलत राहतात. ज्या कामात रस उत्पन्न होतो, ती तुमची आवड बनते आणि तुम्ही ते काम मन लावून करता. परंतु, ही धर सोड वृत्ती तुमच्या अपयशास कारणीभूत ठरते. विविध संधी तुमच्याकडे चालून येतात, पण त्या आपल्या आवडीच्या नाहीत, असे म्हणत तुम्ही त्या सोडून देता. तुम्हाला नावडणाऱ्या गोष्टींची यादी खूप मोठी असते. यावर उपाय म्हणजे, अनेक गोष्टी प्रिय असणे गैर नाही, परंतु किमान एका गोष्टीचे सखोल ज्ञान असणे आवश्य असते. ते मिळवण्याचा प्रयत्न करा. 2 / 12तुम्हाला तुमच्या ठराविक चौकटीच्या बाहेर पडणे धोक्याचे वाटते. त्या चौकटीला तुम्ही इतके सरावलेले असता, की तुम्हाला नवीन गोष्टी करून पाहण्यातही रस वाटत नाही. धोपट मार्ग म्हणतात, त्यानुसार नेमून दिलेल्या पथावरून तुमचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळूनही तुम्ही जुन्याला चिकटून बसण्यात धन्यता वाटते आणि तुमची प्रगती थांबते. यासाठी एकदम मोठे बदल न करता, छोटे छोटे बदल, निर्णय घ्यायला शिका, त्यामुळे मोठे बदल नक्की घडतील. 3 / 12नवनवीन गोष्टी शिकण्याबाबत तुम्ही सदैव उत्सुक असता. जे नवं ते हवं, असा तुमचा स्वभाव असतो. परंतु, त्यामुळे तुमचा स्वभाव अधिक चंचल बनतो आणि आपल्यासाठी नेमके योग्य काय आहे, याचा निर्णय तुम्हाला घेता येत नाही. वेळेवर योग्य निर्णय घेता न येणे, हे अपयशाचे मुख्य कारण आहे. यासाठी चुकलात तरी चालेल, परंतु छोट्या छोट्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिका आणि निर्णयक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. 4 / 12तुम्ही अतिशय भावुक असता. प्रेम, भावना, नातेसंबंध यांना तुमच्या आयुष्यात प्राथमिक स्थान असते. परंतु, भावनांचा अतिरेक तुमच्या प्रगतीच्या आड येतो. भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही चांगल्या संधी गमावता. वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचे की नातेसंबंधांना, या द्विधा मनस्थितीत अडकून तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेता. यासाठी दोन्हीचे संतुलन राखायला शिका.5 / 12आत्मविश्वासाचा अभाव तुमच्या प्रगतीच्या आड येतो. तुमच्यात पुढे जाण्याची क्षमता असूनही तुम्ही आपणहून मागे राहणे पसंत करता. तुमचा आळसही त्याला कारणीभूत ठरतो. यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या विचारांनी विचार करू नका. तुम्ही तुमच्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जायला शिका.6 / 12 या राशीचा स्वभाव मुळातच संशयी असतो. परंतु, संशय दुसऱ्यांवर घेणे इथवर ठीक आहे, परंतु स्वत:च्या कर्तृत्त्वावर संशय घेणे तुमच्या ऱ्हासाचे कारण ठरते. यासाठी तुमच्या मनाने कितीही संभ्रम निर्माण केला, तरीदेखील निर्णय घेताना, पुढे जाताना, नवीन संकल्प करताना न बाचकता, न घाबरता पुढे जा. 7 / 12भावभावना, कर्तव्य, तडजोडी अशा सर्वा बाबतीत तुमची रास संतुलित असल्याचा तुम्हाला फायदा होतो. घर, व्यवसाय, नातेसंबंध याचे संतुलन व्यवस्थित ठेवता. परंतु, अति चिकित्सक वृत्तीमुळे तुम्ही यशाच्या काही संधी गमावून बसता. एकच तत्त्व सगळीकडे लागू होत नाही, तसा एकच अनुभव सगळ्या बाबतीत काम करत नाही. नवनवीन अनुभव घ्या आणि यशाचा मार्ग आपणच तयार करा. 8 / 12तुमच्याकडे अनेक कलागुण असूनही, तुमच्याकडे जे नाही, ते मिळवण्यासाठी तुम्ही अट्टाहास करता. ते मिळत नाही, म्हणून निराश राहता. ते मिळवण्याच्या नादात पैसा, वेळ, व्यक्ती गमावून बसता. या सर्वाचा परिणाम स्वभावावर होऊन तुम्ही नकारात्मक बनता. यासाठी तुम्ही तुमच्या स्वभावाची, व्यक्तिमत्त्वाची सकारात्मक बाजू बघायला शिका व त्यावर अधिक भर द्या.9 / 12या राशीचे लोक बिनधास्त वृत्तीचे असतात. कोणत्याही कठीण परिस्थितीत ते डगमगत नाहीत. उलट आपल्या विनोदी स्वभावाने वातावरण सुसह्य करतात. परंतु, जिथे गंभीर होणे गरजेचे असते, तिथेही तुमचे बेफिकीरपणे वागणे लोकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही अविश्वसनीय ठरता. आपल्या स्वभावावर थोडे नियंत्रण मिळवा आणि कामाच्या बाबतीत काटेकोर बनण्याचा प्रयत्न करा.10 / 12कामाच्या बाबतीत अतिशय अचुक आणि तरबेज अशी तुमची ओळख आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्ही स्वत:वर एवढे दडपण घालता, की त्या दडपणाखाली कामाचा आनंद घेणेच विसरून जाता. कोणतेही काम आनंदाने केल्यास जितक्या सहजतेने होते, ते दडपणाखाली राहून शक्य होत नाही. दडपणामुळे तुम्ही स्वत:वर आणि इतरांवर चिडचिड करत राहाता. हा स्वभाव तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरतो.11 / 12तुमच्याकडे कलात्मकतेची कमतरता नाही, तरीदेखील नेतृत्त्वासाठी तुम्ही पुढाकार घेत नाही. तुमचा आत्मविश्वास कमी पडतो. तो मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वत:वर विश्वास ठेवा. तरच तुम्ही नवीन संधीचा लाभ घेऊन यशस्वी होऊ शकाल. 12 / 12तुम्ही लोकांमध्ये मिसळणे पसंत करत नाही. कारण तुम्हाला भीती असते, लोकांना गमावण्याची. तुम्ही अतिशय भावूक असल्यामुळे तुम्हाला कोणाचाही दुरावा सहन होत नाही. तुम्ही कोणाला दुखवतही नाही. सर्वांचे दु:खं ऐकून घेता, पण स्वत:चे दु:खं कोणालाही सांगत नाही. या सर्व गोष्टींचा भावनिक दबाव मनावर निर्माण होऊन तुम्ही दडपणाखाली जगता आणि आपणच निर्माण केलेल्या नकारात्मक भावनेच्या वर्तुळातून बाहेर पडत नाही. यासाठी जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवा. मोकळे व्हा. मैत्री करा आणि आनंदी राहा, आपोआप यशस्वी व्हाल. आणखी वाचा Subscribe to Notifications