शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 9:27 PM

1 / 15
चातुर्मासातील आणखी एक महत्त्वाचा मानला जाणारा नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. शारदीय नवरात्र देवीचे पूजन करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरी केली जाणार आहे. ०५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. (shardiya navratri 2022)
2 / 15
वास्तविक पाहता दुर्गा देवीचे पूजन, उपासना नेहमीच लाभप्रद ठरते. मात्र, नवरात्रातील नऊ दिवस ग्रह आणि नक्षत्रांच्या विशेष अनुकूलतेमुळे या काळातील दुर्गा देवीचे पूजन अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रात केलेले दुर्गा पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. घरात सुख, समृद्धी, शांतता नांदावी, यासाठी घटस्थापना केली जाते.
3 / 15
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राशीनुसार देवीच्या विविध स्वरुपाचे पूजन करणे शुभलाभदायक ठरते, अशी मान्यता आहे. देवीच्या पूजनासह नैवेद्य आणि अन्य वस्तू अर्पण केल्यास देवीची विशेष कृपादृष्टी आपल्यावर राहून दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद मिळतात, असे सांगितले जाते. तुमची रास कोणती? दुर्गा देवीच्या नेमक्या कोणत्या रुपाचे पूजन करणे ठरेल लाभदायक? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या स्कंदमाता या स्वरुपाचे पूजन करावे. स्कंदमाता देवीला लाल फूल अर्पण करून दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. तसेच पूजनानंतर दुर्गा सप्तशती किंवा दुर्गा चालीसा पठण करणे उत्तम. असे केल्याने देवीचे शुभाशिर्वाद मिळून समस्या, अडचणी, संकटे दूर होऊ शकतील, असे सांगितले जाते.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या महागौरी या स्वरुपाचे पूजन करावे. महागौरी देवीला चंदन, पांढरे फूल आणि पंचमेवा अर्पण करावा. तसेच पांढऱ्या रंगाची बर्फी आणि मिश्री यांचा नैवेद्य अर्पण करावा. पूजनानंतर ललिता सहस्रनाम आणि सिद्धिकुंजिकास्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते, असे सांगितले जाते.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी या स्वरुपाचे पूजन करावे. पूजनावेळी विविध फुले, धूप, कापूर अर्पण करावे. नवरात्रीतील संपूर्ण नऊ दिवस तारा कवच दररोज म्हणावे. तसेच 'ॐ शिव शक्त्यै नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने मनोकामना पूर्णत्वास जाऊन घरात सुख, शांतता नांदते, असे सांगितले जाते.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या शैलपुत्री या स्वरुपाचे पूजन करावे. पूजनावेळी बत्तासे, तांदूळ आणि दही अर्पण करावे. दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. तसेच संपूर्ण नवरात्रात लक्ष्मी सहस्रनाम म्हणावे. असे केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. रोगांपासून मुक्तता मिळते, असे सांगितले जाते.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या कूष्मांडा या स्वरुपाचे पूजन व उपासना करावी. चंदन, केस आणि कापूर अर्पण करावा. तसेच दुर्गा सप्तशती पठण करावे. यासह दुर्गा मंत्राचा सकाळी आणि सायंकाळी कमीत कमी ५ माळा जप करावा. असे केल्याने सर्व क्षेत्रात यश व प्रगती साध्य होऊ शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी या स्वरुपाचे पूजन करावे. पूजनावेळी देवीला फळे, विड्याचे पान, गंगाजल अर्पण करावे. देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. दुर्गा चालीसा पठण करावे. यासह १०८ वेळा लक्ष्मी मंत्रांचा जप करावा. असे केल्याने व्यापार, नोकरी यांतील समस्या दूर होतील. कोषवृद्धी होऊ शकेल.
10 / 15
तुळ राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या महागौरी या स्वरुपाचे पूजन करावे. शुद्ध देसी तुपात तयार केलेली मिठाईचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. कापूर आरती करावी. तसेच नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशतीच्या प्रथम चरित्राचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख, शांतता, समृद्धता नांदू शकेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या कालरात्रि या स्वरुपाचे पूजन करावे. पूजनावेळी जास्वंदाची लाल फुले, गुळ, चंदन अर्पण करावे. कालरात्रि देवीची सकाळी आणि सायंकाळी कापूर आरती करावी. तसेच नवरात्रात दररोज दुर्गा सप्तशती पठण करावे. असे केल्याने घरात नकारात्मकता, निराशा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या स्वरुपाचे पूजन करावे. संपूर्ण नवरात्रात देवीला पिवळ्या रंगाची फुले, केसर, तीळाचे तेल अर्पण करावे. पूजनावेळी पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच श्रीरामरक्षा म्हणावी. असे केल्याने व्यवसायातील समस्या दूर होऊ शकतील आणि प्रत्येक संकाटातून मुक्तता मिळू शकेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या कात्यायणी या स्वरुपाचे पूजन करावे. यावेळी लाल फूल आवर्जुन अर्पण करावे. नारळापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवावा. नवरात्रात दररोज निर्वाण मंत्राचा जप करावा. असे केल्याने कात्यायणी देवीचा शुभाशिर्वाद आपल्याला प्राप्त होईल. मान, सन्मान वाढीस लागू शकेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या कालरात्रि या स्वरुपाचे पूजन करावे. नवरात्रात दररोजच्या पूजनावेळी लाल फूल, फळे अर्पण करावीत. तेलाचा दिवा लावावा. देवी कवच पठण करावे. असे केल्याने दृष्ट लागण्यापासून संरक्षण होते. मिळकतीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींनी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या स्वरुपाचे पूजन करावे. नवरात्रात देवीच्या पूजनावेळी पिवळ्या रंगाची फुले आणि नारिकेलफल अर्पण करावे. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. नवरात्रात दररोज दुर्गा सप्तशती पठण करावे आणि बगलामुळे मंत्राचा एक माळ जप करावा. असे केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Navratriनवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य