शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2022: नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी अजिबात करू नका 'या' ८ चूका, नाहीतर होईल मोठं नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 6:28 PM

1 / 9
Navratri Ashtami 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या देशभर साजरा केला जात आहे. नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस खूप महत्वाचे असतात. या शेवटच्या दोन दिवसात अष्टमी आणि नवमी येते. या दोन दिवसात भाविक आपला उपवास सोडतात आणि दोन्ही दिवशी महत्वाचा पूजा विधी केला जातो. यंदा ३ ऑक्टोबरला महाअष्टमी आहे. यास दुर्गाष्टमी देखील म्हटलं जातं. या दिवशी काही चूका करणं टाळलं पाहिजे.
2 / 9
नवरात्रीत खरंतर सकाळी आंघोळ केल्यानंतर माता रानीचा पाठ केला जातो. पण अष्टमीच्या दिवशी सूर्योदय होण्याआधी आवरणं शुभ मानलं जातं. यादिवशी चुकूनही उशीरापर्यंत झोपू नये. जर तुमचा उपवास असेल तर पहाटे लवकर उठून आंघोळ करुन पूजा जरूर करावी.
3 / 9
विष्णू पुराणानुसार अष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी झोपू नये. असं केल्यामुळे साधकाला पूजेचं फळ प्राप्त होत नाही.
4 / 9
अष्टमीच्या दिवशी हवन केल्याविना पूजा करण्याची चूक करू नये. हवनाविना नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. लक्षात ठेवा हवन करताना आहुतीची सामग्री हवनकुंडाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
5 / 9
नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी निस्वार्थीपणे दुर्गा देवीची आराधना करावी. चालीसा किंवा मंत्र तसेच सप्तशतीचं पठण करताना इतर कोणाशीही बोलू नये किंवा गप्पा मारू नये. असं केल्यास पूजेचं इच्छित फळ साधकाला प्राप्त होत नाही. त्यामुळे संपूर्ण लक्ष केंद्रीत करुन पाठ करावा.
6 / 9
अष्टमीच्या दिवशी उपवास असेल तर नवमीच्या दिवशी कन्या पूजनाच्या आधी काही खाऊ नये. कन्या पूजन आणि विसर्जनानंतरच उपवास सोडावा. यामुळे माता रानीची कृपा तुमच्यावर राहील आणि आशीर्वाद लाभेल.
7 / 9
नवरात्रीत संपूर्ण ९ दिवस तुम्ही उपवास ठेवला असेल तर उपवास सोडण्यासाठी कोणतीही घाई-गडबड करू नका. काही लोक अष्टमीच्या रात्री १२ वाजताच उपवास सोडतात. पण असं करणं चुकीचं आहे. नवमीच्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजा-विधी संपन्न झाल्यावरच उपवास सोडायला हवा. यादिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर उपवास सोडला तर उत्तम. नवमीच्या दिवशी दुधीभोपळा खाऊ नये. तसंच नवमी गुरुवारी आल्यास त्यादिवशी केळं आणि दूधाचं सेवन करू नये.
8 / 9
नवरात्रीच्या दिवशी तुळशी वृंदावनापाशी अंधार असू नये असं म्हटलं जातं. अष्टमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ ९ दिवे लावून प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
9 / 9
अष्टमीच्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. यादिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं.
टॅग्स :Navratriनवरात्री