शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New year 2022 : अंकशास्त्र सांगते, 'या' मूलांकांसाठी २०२२ हे वर्ष दणदणीत विजय मिळवण्याची संधी देणारे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 3:14 PM

1 / 5
२०२२ बद्दल बोलायचे झाले तर, काही जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे. २०२२ च्या एकूण गुणांची बेरीज सहा असेल. अंक सहा हा शुक्र ग्रहाचा अंक मानला जातो. जी चांगली संख्या आहे. ज्या लोकांचा मूलांक सहा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप महत्वाचे असेल. याशिवायही काही मूलांकांसाठी २०२२ हे वर्ष खास असेल चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते मूलांक!
2 / 5
ज्या लोकांची जन्मतारीख १, १०, १९ किंवा २८ आहे त्यांचा मूलांक क्रमांक १ असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. विशेषतः नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात चढ-उतार असतील, परंतु व्यवसायाला पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या वर्षी तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. वर्षाचा मध्य तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. या वर्षी तुम्ही चांगला बँक बॅलन्स तयार करू शकाल.
3 / 5
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक दोन असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले ठरणार आहे. नोकरीत अनेक संधी मिळतील. प्रत्येक आव्हानाला तोंड देत तुम्ही पुढे जात राहाल. या वर्षी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नक्कीच अडचणी येतील, परंतु तुम्ही समजूतदारपणे सर्व गोष्टींना सामोरे जाल. जर तुम्ही बजेट केलं, तर तुम्ही पैसे वाचवू शकाल.
4 / 5
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक सहा असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची प्रचंड शक्यता आहे. या वर्षी कुटुंबातील सदस्यांचे खूप सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विवाहितांसाठीही हे वर्ष चांगले आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. या वर्षी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. उत्पन्न चांगले राहील.
5 / 5
दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संधीची दारे खुली होत आहेत. त्यामुळे वरील दिलेल्या यादीत तुमचा मूलांक असेल तर चांगलेच आहे आणि नसेल तरी खचून जाऊ नका. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर! त्यामुळे सगळ्यांनाच नवीन वर्ष भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषNew Yearनववर्ष