शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२३ केतु ग्रहाचे वर्ष! फक्त ‘ही’ ७ कामे करा, प्रतिकूल प्रभावातून मुक्तता; अखंड लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 7:57 AM

1 / 12
२०२२ वर्षाची सांगता होऊन आता नवे २०२३ वर्ष सुरू झाले आहे. जगभरात अत्यंत उत्साहाने, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक, ज्योतिषीय दृष्टिकोनातून नवे वर्ष अतिशय महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
2 / 12
सन २०२३ मध्ये अधिक महिना असणार आहे. तसेच ज्योतिषीय दृष्टिने विचार केल्यास अनेक महत्त्वाचे ग्रह या वर्षांत राशीपरिवर्तन करणार आहेत. यापैकी शनी, गुरु, राहु-केतु यांचे राशीपरिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच यंदाचे वर्ष हे केतु ग्रहाचे वर्ष मानले जात आहे. केतु ग्रह हा मूलांक ७ चा स्वामी ग्रह मानला जातो आणि या वर्षाची बेरीजही २+०+२+३=७.
3 / 12
ज्योतिषशास्त्राची शाखा असलेल्या अंकशास्त्राचा विचार केल्यास ७ मूलांचा स्वामी केतु आहे. त्यामुळे या पूर्ण वर्षावर केतु ग्रहाचा प्रभाव असेल. केतु हा मायावी, क्रूर आणि छाया ग्रह मानला जातो. मात्र, एखाद्या कुंडलीत केतु ग्रह शुभ स्थानी असेल, तर त्या व्यक्तीला अतिशय सर्वोत्तम फले देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. केतु ग्रह कायम वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
4 / 12
आताच्या घडीला केतु ग्रह तूळ राशीत विराजमान आहे. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात केतु वक्री चलनाने कन्या राशीत प्रवेश करेल. केतु ग्रहाच्या प्रभावामुळे नवीन वर्षात विचित्र घटना घडू शकतात. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. केतु हा विषाणूजन्य आजारांशीही संबंधित मानला जातो. नवीन वर्ष २०२३ मध्ये रोगांमुळे, जागतिक स्तरावर लोक आणि संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
5 / 12
अशा परिस्थितीत नवीन वर्ष २०२३ शुभ होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सर्व राशींसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे जीवनात सुख-समृद्धी तर येतेच, शिवाय केतुच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्तता मिळू शकते. सन २०२३ हे वर्ष फायदेशीर बनवण्यासाठी काही कामे करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया, ज्योतिषीय उपाय...
6 / 12
सन २०२३ हे वर्ष शुभ होण्यासाठी, दररोज कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास अशा प्रतिमेचे पूजन करावे. यावेळी ॐ नमो: भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच बीज मंत्राचाही जप करावा. असे केल्याने याचे शुभ फल मिळू शकते, असे म्हटले जाते.
7 / 12
नवीन वर्ष २०२३ लाभदायक होण्यासाठी आणि केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी भगवान कालभैरवाची पूजा करावी. केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा. श्री भैरव चालिसाचे पठण करावे. यासोबतच पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे. असे केल्याने केतु लाभदायक ठरू शकतो आणि जीवनात सुख-समृद्धीही आणतो, असे म्हटले जाते.
8 / 12
नवीन वर्ष २०२३ फायदेशीर करण्यासाठी नवीन वर्षात पिंपळाचे पूजन करावे. तसेच शक्य असल्यास दररोज श्रीगणेशाची पूजा करावी. गणपती बाप्पाल २१ दुर्वा अर्पण कराव्या. पूजेनंतर गणेश द्वादश नामक स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकते. तसेच जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात, असे सांगितले जाते.
9 / 12
केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी गोमातेला अन्नदान करावे. गरजूंना वस्त्रदान आणि भोजन द्यावे. प्राणीमात्रांना त्रास होईल, असा गोष्टी टाळाव्यात. असे केल्याने केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, तसेच घरातील सदस्यांचे नातेसंबंध दृढ होऊ शकतात, असे सांगितले जाते.
10 / 12
नवीन वर्ष शुभ आणि लाभदायक होण्यासाठी शक्य तेवढा दानधर्म करावा, असे म्हटले जाते. यासोबतच घरातील ज्येष्ठांची सेवा करावी. ध्यानधारणा करावी. असे केल्याने केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, असे म्हटले जाते.
11 / 12
नवीन वर्षांत पैशांचे झाड मानल्या गेलेल्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या अश्वगंधाचे रोपटे घरात लावावे. तीळाचे दान करावे. शक्य असल्यास एखाद्या मंदिराच्या कळसावर ध्वज लावावा. असे केल्याने भाग्याची भक्कम साथ वर्षभर आपल्याला मिळू शकते. तसेच करिअरमध्ये यश, प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतात, असे म्हटले जाते.
12 / 12
राहु आणि केतु हे ग्रह नेहमी एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. आताच्या घडीला राहु मेष राशीत असून, ऑक्टोबर २०२३ मध्ये मीन राशीत विराजमान होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य