New Year resolutions 2023: If you resolve to wake up at 5 am, you will have 13 months in 2023!
New Year resolutions 2023: जर पहाटे ५ वाजता उठण्याचा संकल्प केलात, तर २०२३ मध्ये तुमच्या वाट्याला १३ महिने येतील! By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 1:50 PM1 / 6आपले पूर्वज ब्राह्ममुहूर्तावर उठून कामाला सुरुवात करत असत. याउलट आपली सकाळ होते तीच ७-८ नाहीतर १० वाजता. उशिरा दिवस सुरु झाला की पुढची ठरवलेली कामे बारगळतात. कामे ठप्प झाली की मनावर दडपण येते. ताण वाढतो. नैराश्य येते आणि वाईट विचार डोक्यात घोळत राहून उशिरापर्यंत जागरण आणि सकाळी उशिराने उठणे हे दुष्टचक्र चालू राहते. हे चक्र सुरळीत करायचे असेल तर पहिली पायरी, पहाटे ५ ला उठणे. त्यामुळे काय होईल?2 / 6पहाटे उठण्याचे अनेक फायदे आहेत. त्यावेळी मन शांत असते. विचार कमी असतात. वातावरण प्रसन्न असते. आजूबाजूला शांतता असते. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. आजवर जे जे यशस्वी लोक होऊन गेले, त्यांच्या यशोगाथा वाचल्या तर त्यात ते पहाटे उठून दिवसाची सुरुवात करत असल्याचे कॉमन फॅक्टर आढळून येईल. आपल्यालाही यशस्वी व्हायचे असेल तर पहाटे उठण्याचा संकल्प करू. त्याचे तीन मुख्य फायदे जाणून घ्या. 3 / 6दिवस २४ तासांचा असला तरी आपल्या झोपेतून, मोबाईलमधून किती तास शिल्लक राहतात, यावर कामाचे वाटप ठरते. याउलट पहाटेचे २ तास अर्थात ५-७ ची वेळ आपल्याला महत्त्वाच्या कामांना देता येईल. जे लोक म्हणतात की दिवसभरात आम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही, अशांनी या दोन तासांचा सदुपयोग करून घ्यावा. तर विद्यार्थ्यांनी या वेळेत वाचन, चिंतन, मनन करावे. 4 / 6जर आपण रोज सातत्याने पहाटे ५ वाजता उठण्याचा सराव केला तर आठवड्याला १४ तास एक्ट्रा, तर वर्षाला ७२८ एवढे तास एक्ट्रा मिळतात. ७२८ तास म्हणजे ३० दिवस अर्थात एक महिना तुम्हाला इतरांपेक्षा अधिक मिळतो आणि तो उपयोगात आणला तर यशस्वी होण्याला कारणीभूत ठरतो. त्यामळे वेळेत झोपा आणि पहाटे उठा, फायद्यात राहाल. 5 / 6दिवसभरात आपण काही काम काढतो आणि तेवढ्यात फोन, मित्र, पाहुणे, कामांमुळे आपल्या नियोजनात खंड पडतो. पहाटे तसे काहीच होत नाही. सगळे झोपलेले असताना आपल्याला नियोजित कामासाठी अबाधित वेळ मिळतो. त्या वेळेत कोणी फोन करत नाही की कोणी बोलवायला येत नाही. तो एकांत सुखदायक आणि शांतीदायक असतो, त्याचा पुरेपूर लाभ करून घ्यावा. 6 / 6अशाप्रकारे सतत २१ दिवस तुम्ही पहाटे उठण्याचा सराव केलात तर २२ व्या दिवशी तुम्हाला आपणहून जाग येईल आणि इतरांपेक्षा एक महिना जास्त तुम्हाला प्रगती करण्याच्या दृष्टीने बोनस मिळेल. जरी कधी चुकून खंड पडला तरी नाराज होऊ नका, दुसऱ्या दिवशीपासून नव्याने २१ दिवसांची सवय लावा, पण प्रयत्न करत राहा. प्रयत्न प्रामाणिक असतील तर त्याला यश मिळेल हे नक्की. कारण संत सांगतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण! आणखी वाचा Subscribe to Notifications