Nirjala Ekadashi 2024: Do Kumbhdan on Nirjala Ekadashi; You will get immense merit and be lucky!
Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला करा कुंभदान; मिळेल अपार पुण्य आणि व्हाल भाग्यवान! By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 7:00 AM1 / 7उन्हाळ्यात झालेली काहिली आणि पावसाच्या आगमनाची आतुरता अशा संमिश्र मनःस्थितीच्या काळात हे व्रत येते. जेणेकरून पूर्व अनुभवाचा विचार करून लोकांनी पुढच्या उन्हाळ्यात त्रास होऊ नये, पुढच्या पिढयांना त्रास होऊ नये, या जाणिवेसाठीदेखील या व्रताचे आयोजन पूर्वसुरींनी केले असावे. 2 / 7निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. त्याचबरोबर या दिवशी जलकुंभदान करण्याची प्रथा आहे. 3 / 7दानाच्या अनेक प्रकारांमध्ये जलकुंभदानाला महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसे आदरातिथ्य म्हणून पाणी देतो, तसेच पावसाळ्यात मचूळ पाण्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दुषित पाणी प्यावे लागते. यासाठी अशा कुटुंबांना आपल्या कडून एक घडाभर स्वच्छ पाणी पुरवता आले, तर ते जलकुंभदान पुण्यदायी ठरेल.4 / 7दानाचा उद्देशच हा आहे, की समोरच्याची गरज ओळखून अडल्या-नडलेल्याला यथाशक्ती मदत करणे. जलदान केवळ उन्हाळ्यात नाही, तर पावसातही गरजेचे आहे, हे ओळखून वस्त्रगाळ केलेले अथवा उकळलेले पाणी गरजवंतांना द्यावे, यासाठी निर्जला एकादशी निमित्त या विधीचे आयोजन केले आहे.सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते.5 / 7आदल्या दिवशी गंगादशहरा पूर्णत्वास जातो. तर ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही `निर्जला एकादशी' म्हणून प्रसिद्ध आहे. पाण्याचे महत्त्व निर्जला एकादशी केल्याशिवाय कसे कळणार? 6 / 7पाण्याला आपण `जीवन' म्हणतो. `जलति जीवयति लोकानिती' म्हणजे जीव जगवण्याचे काम पाणी करते. मग तो प्राण्यांचा असो की, वृक्षवेलींचा! सर्व उपचारविधी करता येणे शक्य नसेल त्यांनी निदान चार पाच जणांना थंड पेय पदार्थ तरी जरूर द्यायला हरकत नाही. 7 / 7अशा तऱ्हेने तुम्हीदेखील हे सोपे व्रत अथवा जलदान विधी करून पुण्याचे भागीदार सहज होऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications