शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: ‘या’ ४ मूलांकांसाठी शानदार महिना; उत्तमोत्तम संधीसह शुभ-लाभाचा काळ! तुमचा मुलांक कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 8:34 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने ऑक्टोबप्रमाणे नोव्हेंबर महिनाही महत्त्वाचा मानला गेला आहे. या महिन्यात ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, एक ग्रह चलनबदल करणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध, नवग्रहांचा सेनापती मंगळ, शुक्र राशीपरिवर्तन करणार असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पति चलनबदल करणार आहे. (November 2022 Numerology)
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते.
3 / 12
तुमच्या जन्मतारखेच्या मूलांकानुसार, नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल, तुम्हाला लाभाच्या संधी मिळू शकतील का, नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि आरोग्य कसे असेल, हे सर्व तुम्ही तुमच्या मूलांकावरून जाणून घेऊ शकता. तुमच्यासाठी आगामी कालावधी कसा असू शकेल, तुमचा मूलांक कोणता, जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. नोव्हेंबर महिन्यात सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घेऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांची मोलाची साथ लाभेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. खूप दिवसांनी मन:शांती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला ठरणार आहे. मोठे आर्थिक प्रश्नही सुटताना दिसू शकतील.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या महिन्यात तुमचे विरोधक पराभूत होतील. जास्त भावनिक विचार टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते. महिन्याचा शेवटचा आठवडा आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतो. हा परिणाम तुमच्यासाठी शुभ ठरू शकेल. साहित्य, संगीत आणि कलेशी संबंधित लोकांसाठी हा काळ इच्छित यश देणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. गुरु ग्रह या महिन्यात स्वराशीत म्हणजेच मीन राशीत मार्गी होणार आहे. तुमच्या हट्टी स्वभावामुळे सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होऊ शकतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. राजकारणी आणि प्रसारमाध्यमांसाठी हा महिना अस्वस्थ करणारा ठरू शकतो.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. संकल्पित कामे पूर्ण होऊ शकतात. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते. दाम्पत्य जीवन सुखाचे होऊ शकेल. व्यापार्‍यांसाठी हा काळ काहीसा प्रतिकूल ठरू शकतो. योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका. सावधगिरी बाळगून कामे करावीत.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. नोव्हेंबर महिन्यात बुध तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या मूलांकाच्या व्यक्तींनी सतर्क राहून कामे करावीत. अनावश्यक वाद टाळावेत. अन्यथा नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विनाकारण आलेला मानसिक ताण कामावर, कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणामकारक ठरू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या महिन्यात शुक्र स्वराशीतून म्हणजेच तूळ राशीतून वृश्चिक राशीत विराजमान होणार आहे. या महिन्यात तुम्ही महत्त्वाची योजना आखण्यात यशस्वी ठराल. खूप दिवसांनी मन:शांती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला जाणार आहे. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. तुम्हाला पूर्ण विश्वास असलेली व्यक्ती तुम्हाला शेवटच्या क्षणी फसवू शकते. दुसरीकडे, नवीन लोकांची मदत मोलाची ठरू शकेल. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरू शकेल. विवाहेच्छुक तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. सकारात्मक विचारसरणीमुळे प्रलंबित कामे यशस्वी होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकेल. व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. नोव्हेंबर महिन्यात मंगळ वक्री चलनाने मिथुन राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. कल्पनांवर आधारित निर्णय चुकीचे ठरू शकतात. तुमचे विरोधक तुमच्या मानसिक दुर्बलतेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील हे लक्षात ठेवा. कोणाच्या मताने प्रभावित होऊन कोणताही निर्णय न घेणेच योग्य ठरेल. योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष