शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: दसरा शुभ योगात, २ अन् ७ मूलांकांवर विशेष कृपा; धन-धान्य वृद्धी, भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:38 PM

1 / 12
Numerology: नवरात्राची सांगता होत आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला नवरात्र उत्सव समाप्त होईल. नवरात्र उत्सव आणि दसरा अगदी मोठ्या प्रमाणात जल्लोषात देशभर साजरे केले जातात. देशातील अनेक ठिकाणी रावणदहन, रामलीला असे कार्यक्रम होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्राची सांगता होत असताना आणि विजयादशमीला काही विशेष शुभ योग जुळून येत आहेत.
2 / 12
ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. तूळ राशीतील चतुर्ग्रही योग, गुरु आणि राहुचा चतुर्ग्रहांशी असलेला समसप्तक योग तसेच विविध प्रकारचे जुळून येत असलेले राजयोगाएवढे शुभ असलेले अद्भूत योग यांचा परिणाम मूलांकांवरही पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींवर जाता जाता दुर्गा देवीची अपार कृपा होऊ शकेल? कोणत्या मूलांकांना दसरा तसेच आगामी कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा लाभ मिळू शकेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कौतुक होईल. आनंद होईल. व्यावसायातील यशाबद्दल खूप निश्चिंत असाल. आर्थिक बाबतीत प्रगतीच्या संधी मिळतील. पण अतिआत्मविश्वास घातक ठरू शकेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकेल.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. धनलाभासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. सर्व कामे संयमान करावी. चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन रोमँटिक असेल. चांगला फायदा होईल. एकांतात वेळ घालवासा वाटेल. जीवनात आनंद आणि शांती अनुभवाल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. आर्थिक लाभाची परिस्थिती चांगली राहील. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्या बाजूने परिणाम देईल. नोकरदार लोकांच्या कामाची प्रशंसा होईल. इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना दिलासा मिळू शकेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जीवनात आनंद मिळेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहा. गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असेल. नोकरी आणि व्यावसायिकांसाठी चढ-उतार येऊ शकतील. पण लाभ होत राहील.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. नवीन गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्यातील प्रतिभा लोकांसमोर येईल. चांगली दाद मिळेल. कार्यशैलीत बदल होण्याची शक्यता आहे. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. काही दिवस घरातील वातावरण बिघडू शकते. जीवनात आनंद आणि सुसंवाद आणेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. संपूर्ण कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांच्या अधिकारात वाढ होईल. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. वडिलांसोबतचे संबंध काही कारणाने बिघडू शकतात. कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक बाबींमध्ये अचानक फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर यश मिळवाल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. यशाबद्दल आनंद होईल. नोकरदारांना सहकाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामात स्पष्टता ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. विरोधक तुमचे कोणतेही नुकसान करण्यात अपयशी ठरतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांचा आणि शिक्षकांचा पूर्ण पाठिंबा असेल. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसून येईल.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या अनेक संधी मिळतील. करिअर सुरू करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ राहील. व्यवसायात झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेचा जितका अधिक वापर कराल तितके जास्त आर्थिक लाभ मिळतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अचानक अडचणी वाढू शकतात. नोकरी सोडण्याचा विचार मनात येऊ शकतो.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. काही कारणास्तव, विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन उडू शकेल. कुटुंबातील सदस्यांकडून कमी पाठिंबा मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्राच्या मदतीने प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. अडकलेले पैसे मिळू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषDasaraदसरा