शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: ‘या’ ५ मूलांकांना पितृपक्षाची सांगता उत्तम, फायदेशीर काळ; धनवृद्धीचा शुभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 1:33 PM

1 / 12
Numerology: पितृपक्ष सुरू असून, आगामी कालावधीत इंदिरा एकादशी, प्रदोष आणि सर्वपित्री अमावास्या आहे. सर्वपित्री अमावास्या ही पितृपक्षाची सांगता आहे. यानंतर १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून, नवरात्रीला प्रारंभ होणार आहे.
2 / 12
सध्याची ग्रहस्थिती अशी आहे की, गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सित, रवी आणि बुध कन्येत मंगळ आणि केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुर्भत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून होईल. या ग्रहमानाचा राशींवर जसा प्रभाव पडेल, तसाच तो मूलांकांवरही पडू शकेल. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र.
3 / 12
अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. या सर्व ग्रहस्थितीचा विचार केल्यास कोणत्या मूलांकांना आगामी काळ अतिशय लाभदायक, विविध आघाड्यांवर शुभ-फलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यावसायिक प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. चांगली बातमी मिळू शकते. प्रभाव लक्षणीय वाढेल. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. घरातील कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. विचारपूर्वक निर्णयाने यश मिळेल. संपत्ती वाढण्याची शुभ शक्यता आहे. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कराल, तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील. चांगले परिणाम दिसून येतील.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि अभ्यासात अडचण येऊ शकते. नोकरदारांना अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. टीम लीड करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ आहे. परंतु, खर्च जास्त असू शकतो. गुंतवणूक नियंत्रणात ठेवावी. अन्यथा नुकसान होऊ शकते. खर्च जास्त होतील, त्यामुळे चिंता वाढू शकते.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. पितृपक्षातील आगामी काळ शुभ राहील. आर्थिक लाभासाठी संधी मिळतील. भागीदारीत केलेली गुंतवणूक शुभ परिणाम आणू शकते. नोकरदारांना दुसऱ्या कंपनीकडून फोन येऊ शकतो. व्यावसायिकांना कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात अचानक शुभ प्रसंग येऊन परस्पर प्रेम अधिक दृढ होईल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीच्या काही कारणास्तव थोडेसे चिंतित असाल. मित्रांशी संभाषण करताना, नवीन माहिती मिळेल, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. पैशाशी संबंधित बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा बजेट बिघडू शकते.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक बाबतीत कडू-गोड अनुभव येतील. व्यवसायातील सौदे चांगले होतील. परंतु, खूप धावपळ करावी लागू शकते. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतील. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली बातमी मिळेल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. हाती घेतलेल्या कामांत यशस्वी व्हाल. लाभाच्या शुभ संधी निर्माण होतील. जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता. आर्थिक बाबतीत चढ-उतार येऊ शकेल. मिळकत आणि खर्चात योग्य ताळमेळ ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. नोकरदारांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल.सुख-समृद्धीच्या शुभ संधी निर्माण होतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. धनवृद्धीच्या शुभ संधी मिळतील. ध्येय साध्य करण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर कराल. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतील. यश मिळेल. जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रभावशाली लोकांशीही भेट होईल, ज्यांच्याकडून भविष्यात चांगले लाभ मिळतील.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. आईकडून आर्थिक मदत मिळेल. वडिलांसोबत सुरू असलेला वाद मिटू शकेल. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. मित्रांकडून अडकलेले पैसे मिळू शकतील. मन प्रसन्न राहील. मुलांच्या कामामुळे धावपळ करावी लागू शकते. पैशाची मोठी देवाणघेवाण टाळा, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषpitru pakshaपितृपक्ष