numerology end of november 2024 impact and effect on all mulank numerology number in marathi
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 6:15 PM1 / 12Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.2 / 12नोव्हेंबर महिन्याची सांगता होत असून, प्रदोष, शिवरात्रि या दोन्ही दिवशी व्रताचरण केले जाणार आहे. ही दोन्ही व्रते महादेव शिवशंकरांना समर्पित आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात होत आहे. डिसेंबर महिना अनेकार्थाने विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे. सण-उत्सवांसह चार ग्रहांचे गोचर जगावर प्रभावकारी मानले जात आहे.3 / 12अंकशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याची सांगता आणि डिसेंबरची सुरुवात होतानाच्या कालावधीत आर्थिक आघाडी, गुंतवणूक, करिअर, कुटुंब, शिक्षण या क्षेत्रांवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होतील. खर्च जास्त होऊ शकतात. चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात शांतता आणेल. 5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कामाशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन शिकून, नवीन विचाराने सुरुवात केली तर यश नक्की मिळेल. आर्थिक बाबतीत यश मिळू शकेल. भागीदारीत केलेली गुंतवणूक आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते.6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. अपेक्षा पूर्ण होतील. यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकेल. प्रेमसंबंधांमध्ये काळ अनुकूल राहील. जोडीदारासोबत चांगला काळ घालवता येऊ शकेल. खर्च वाढू शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही नुकसान सहन करावे लागू शकेल.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी मिळू लागतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. चांगली बातमी मिळू शकेल. काही कारणास्तव खर्चांत वाढ होऊ शकते. प्रेमसंबंधात अधिक प्रयत्न करावे लागतील. मानसिक शांतता लाभू शकेल.8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. धनलाभ होऊ शकेल. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम भविष्यात यशकारक ठरू शकतील. आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. जीवनात शांतता आणि आनंदाचा अनुभव घेऊ शकाल.9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. सुख-समृद्धीची शुभ परिस्थिती निर्माण होत आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. स्वतःवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेतले तर यशस्वी मिळण्याची शक्यता वाढू शकेल. आनंददायी घटना घडू शकतील. कामातील यश-प्रगती पाहून मन प्रसन्न होऊ शकेल.10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकेल. प्रवास यशस्वी होऊ शकतील. जीवनशैलीत बरेच बदल होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी हाती घेतलेल्या कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. 11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळाले तरी अपेक्षेपेक्षा कमी असेल. आर्थिक बाबतीत वेळ प्रतिकूल असू शकतो. पैसा खर्च होऊ शकतो. चर्चा करून परिस्थिती सोडवली तर बरे होईल.12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. जीवनात सुख-समृद्धीची शुभ संधी निर्माण होऊ शकते. आर्थिक खर्च अधिक असू शकतो. परस्पर मतभेद होऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चांगले होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications