शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नववर्षाचा पहिला गुरु प्रदोष: ६ मूलांकांना अपार लाभ, सुख; दत्तगुरु-स्वामी-महादेव शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 14:31 IST

1 / 12
Numerology: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेलेला चैत्र महिना सुरू आहे. गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी नववर्षातील पहिले प्रदोष व्रत आहे. गुरुवारी प्रदोष व्रत आल्याने हा दिवस गुरु प्रदोष म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी प्रदोष व्रत येणे शुभ मानले जाते. या दिवशी महादेवांसह दत्तगुरु, स्वामी यांचे विशेष पूजन करणे अत्यंत पुण्य फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी गुरु ग्रहाशी संबंधित काही गोष्टी करणे लाभदायक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास पहिल्या गुरु प्रदोष व्रताला अनेक शुभ योग जुळून आलेले आहेत.
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
3 / 12
मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. तसेच अनेक राजयोग जुळून आले आहेत. या सर्व ग्रहांचा मूलांकांवरही परिणाम होत असतो. गुरु प्रदोष व्रताला जुळून आलेल्या शुभ योगांचा कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या मूलांकाला सर्वोत्तम सकारात्मकता लाभू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. काही अडचणी येऊ शकतात. स्पष्टपणे संवाद साधून कोणताही गैरसमज टाळू शकता. व्यस्तता वाढू शकेल. कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ राहू शकणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकेल. आर्थिक आघाडी सकारात्मक राहू शकेल.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. शांत आणि संतुलित राहू शकाल. मार्गात येणाऱ्या समस्येवर मात करू शकाल. काही लोकांशी चांगला संपर्क होण्याची शक्यता आहे. कारकिर्दीत प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. काही काळापासून प्रलंबित असलेला एखादा प्रश्न सुटू शकतो. दिलासा मिळेल. कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित ध्येय साध्य करू शकाल. कामाच्या ठिकाणी मनाचे ऐका आणि निर्णय घ्यावे. चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत लोकांशी संपर्क करून यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. वैयक्तिक आयुष्यात काही रोमांचक आणि मनोरंजक घडामोडी घडू शकतात. काही जण एखाद्याला चांगला मार्ग दाखवतील आणि त्याचे चांगले परिणाम मिळतील. जीवनात आनंद आणि समृद्धीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी विचारांवर ठाम राहिल्याने यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. मित्र, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. कोणत्याही गोष्टीत जास्त रमू नका. अन्यथा ते हानिकारक ठरू शकते. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. सुख आणि समृद्धी लाभू शकेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. मार्गात येणाऱ्या आव्हानाला तोंड देण्यास सक्षम असू शकाल. आशावादी राहावे. कुटुंबासोबत वेळ घालवून आनंदी आणि समाधानी राहू शकाल. संपत्ती वाढीसाठी शुभ संधी निर्माण होत राहतील.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास सांगितले जाऊ शकते; हे कामाशी संबंधित असू शकते. घराच्या नूतनीकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा दिसून येतील. प्रकल्प यशाकडे वाटचाल करतील.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून अनपेक्षित उत्तम सल्ला मिळू शकेल. सकारात्मक बदल घडू शकेल. ते दीर्घकाळात फायदे देऊ शकतील. कामाच्या ठिकाणीही प्रकल्प हळूहळू प्रगतीच्या मार्गावर पुढे जातील. विचारपूर्वक गुंतवणूक केली तर आर्थिक फायदा होऊ शकतो.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आनंदासाठी प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, प्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि आदरही वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिकshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थ