शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना महिनाअखेरिस मिळणार शुभ वृत्त, धन-संपत्तीत होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 11:14 AM

1 / 5
Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल सांगते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, तसाच प्रत्येकाचा भाग्यांक आणि मूलांकही असतो.
2 / 5
तुमची जन्मतारीख, महिना आणि जन्माचं पूर्ण वर्ष यांना एकत्र करून येणारी संख्या ही तुमचा भाग्यांक असते. तर तुमच्या जन्माच्या तारखेची बेरीज ही मूलांक असते. उदाहरणार्थ जर तुमचा जम्न ७, १६, २५ तारखेला झाला असेल तर ७ हा तुमचा मूलांक असेल. पाहुया कोणासाठी महिनाअखेरिसचे दिवस शुभ आहेत.
3 / 5
मूलांक १ असलेल्या व्यक्तींच्या मान सन्मानात वृद्धी होील. या आठवड्यात तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याचीही साथ मइळेल. व्यापारात नव्या गोष्टी करण्याकडे कल राहील. व्यापाराच्या दृष्टीनं चांगला काळ आहे. जुन्या मित्रांची भेट होईल.
4 / 5
मूलांक दोन असलेल्या व्यक्तींसाठीही हा काळ चांगला आहे. कामकाजाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहिल. अडकलेले पैसे मिळण्याचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीनं चांगला काळ आहे. उत्पन्न सामान्य राहिल. कुटुंबीयांसोबत तीर्थक्षेत्राच्या प्रवसाचे योग आहेत. विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
5 / 5
मूलांक ४ असलेल्या व्यक्तींसाठीही हा आठवडा उत्तम राहिल. व्यापाराबाबत असलेल्या चिंता दूर होण्याची शक्यता आहे. तसंच दांपत्यांमध्येही चांगला संवाद राहिल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदीचे योगही आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्र