शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? मकर संक्रांतीला आर्थिक लाभ; पद-प्रभाव वाढेल, सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 7:55 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिना विशेष ठरणारा आहे. महत्त्वाचे ग्रह या महिन्यात राशीपरिवर्तन करत आहेत. याशिवाय सन २०२३ मधील पहिला मोठा सण मकर संक्रांती देशभरात साजरा करण्यात येईल. मकर संक्रांतीचा सण देशभरात विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. (Numerology)
2 / 12
मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचे विशेष योग जुळून येत आहेत. पैकी सूर्य आणि शनी एकाच म्हणजे मकर राशीत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र जरी मानले गेले असले, तरी ते शत्रू ग्रह आहेत. या दोन ग्रहांची युती फारशी सकारात्मक मानली जात नाही. (makar sankranti 2023)
3 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून भविष्यकथन केले जाते. ग्रहांच्या चलनाचा आणि राशीपरिवर्तनाचा मूलांकांवरही प्रभाव आणि परिणाम होत असतो. मकर संक्रांतीचा काळ कोणत्या मूलांकांना वरदान काळ ठरू शकतो? तुमची बर्थडेट आणि मूलांक काय? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. मूलांक १ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारा ठरू शकेल. पण, कामाच्या ठिकाणी विरोधकांच्या वर्चस्वामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. याचा परिणाम कामांवरही होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष फलदायी ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. उत्साहाने काम पूर्ण करू शकाल. सकारात्मक ऊर्जेचा संचार राहील. जुन्या समस्या संपण्याची शक्यता आहे. अनोळखी लोकांकडून अनपेक्षित सहकार्य मिळेल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकून कौतुक होऊ शकेल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. मूलांक ३ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनुभव मिळतील. योग्य सतर्कता बाळगल्यास फसवणूक टळू शकेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कामाच्या योजना प्रत्यक्षात येतील. सुरुवातीच्या संघर्षानंतर यश मिळेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. मूलांक ४ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ फायदेशीर ठरू शकेल. मोठा नफा कमावला येऊ शकेल. कठोर परिश्रमाने कामे पूर्ण कराल. नोकरी, व्यवसायाशी संबंधित लोकांचा प्रभाव वाढेल. नशिबाच्या जोरावर कार्यक्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळू शकेल. राजकारणाशी निगडित लोकांसाठी यशाचा आठवडा असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींना आगामी आठवडा काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनामिक भीती वाटेल. मन खिन्न होऊ शकेल. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून कामे पूर्ण करणे उपयुक्त ठरू शकेल. आर्थिक बाबींवर लक्ष द्या. स्वतः आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. मूलांक ६ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. अनावश्यक समस्या उद्भवू शकतात. मात्र, कालांतराने मन प्रसन्न आणि सकारात्मक होऊ शकेल. आपल्या उर्जेचा कार्यक्षेत्रात पुरेपूर वापर केल्यास यश मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर काळ ठरू शकतो. प्रवास लाभदायक ठरू शकतात. मातृपक्षाकडून विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. मूलांक ७ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ उत्तम संधींचा ठरू शकतो. आत्मविश्वासाने पुढे जाणे उपयुक्त ठरेल. अहंकार टाळा. स्वतःहून आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकेल. आर्थिक बाबतीत घेतलेल्या निर्णयांमुळे धनलाभाची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. सरकारी यंत्रणेकडून मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, संधीचा फायदा घ्या आणि लाभ घ्या. धार्मिक आणि आध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण काळ असेल. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. मूलांक ९ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ प्रगतीकारक ठरू शकेल. यश आणि प्रसिद्धी मिळेल. नोकरी, व्यवसायाशी संबंधित लोकांच्या पद आणि प्रभावात वाढ होईल. स्वत:हून आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. साहित्य, संगीत आणि कलेशी संबंधित लोकांसाठी आनंददायी आणि इच्छित यश देणारा काळ ठरू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रMakar Sankrantiमकर संक्रांतीAstrologyफलज्योतिष