Numerology prediction about mulank 4 people People born on this date are experts in making friends
Numerology: मित्र बनवण्यात एक्सपर्ट असतात 'या' तारखेला जन्मलेले जातक; लगेच प्रभावित होतात लोक By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 7:49 PM1 / 7ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राचेही एक विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो ती तारीक म्हणजे त्या व्यक्तीचा मूलांक असते. या मूलांकावरून, कुठल्याही व्यक्तीच्या चारित्र्यापासून ते त्या व्याक्तीच्या भविष्यासंदर्भातही बरेच काही अनुमान लावले जाऊ शकतात.2 / 7जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 17 तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक 1+7= 8 असतो. याच पद्धतीने 8 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांकही 8 हाच असेल. याच पद्धतीने मूलांक 4 असलेल्या लोकांचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 अथवा 31 तारखेला झालेला असतो.3 / 7चतुर असतात हा मूलांक असलेले लोक - मूलांक 4 असलेल्या जातकांसंदर्भात बोलायचे झाल्यास या जातकांचा संबंध राहूसोबत असल्याचे मानले जाते. यामुळे हे लोक अत्यंत चतुर असतात. ज्या लोकांचा मूलांक 4 असतो, ते मित्र बनवण्यात अत्यंत एक्सपर्ट असतात. मात्र, त्यांच्या स्वभावामुळे मैत्री अधिक काळ टीकत नाही. 4 / 7शत्रूही भरपूर असतात - मूलांक 4 असलेल्या लोकांमध्ये मुत्सद्देगिरीचा गुण असतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात शत्रूंची कमी नसते. एकापासून सुटका झाली, की लगेच दुसरा येऊन उभा राहतो. अशा स्थितीत हा मूलांक असलेल्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. अन्यथा शत्रूंमुळे त्यांचे नुकसानही होऊ शकते.5 / 7लगेच प्रभावीत होतात लोक - अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेल्या लोकांना मुक्तपणे जगायला आवडते. हे लोक मैत्री करण्यात अत्यंत एक्सपर्ट असतात. ते मित्रांवर प्रचंड पैसा खर्च करतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे लोक त्यांच्यावर लगेच प्रभावित होतात. हा मूलांक असलेल्या लोकांमध्ये इतरांवर प्रभाव टाकण्याची विलक्षण क्षमता असते.6 / 7कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेत नाहीत - मूलांक 4 असेलेले लोक सर्वच कामे अत्यंत सांभाळून करतात. हे लोक कुठलेही काम करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. हे लोक घाई-गडपडीत कुठलाही निर्णय घेत नाहीत. यामुळे नात्यांमध्ये, नौकरीत आणि बिझनेसमध्ये यांचे फारसे नुकसान होत नाही. 7 / 7(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्व सामान्य मान्यतांवर आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी कत नाही.) आणखी वाचा Subscribe to Notifications