शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: फेब्रुवारीची सांगता शुभ होईल! ‘या’ ४ मूलांकांना शानदार काळ; यश-प्रगती, लाभाच्या उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 1:40 PM

1 / 12
Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील काही ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करीत असतात. ग्रहांच्या या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा तसेच ग्रहांच्या गोचराचा प्रभाव जरा सर्व राशींवर पडतो, तसा तो मूलांकांवरही पडत असतो, असे सांगितले जाते.
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे.
3 / 12
आताच्या घडीला बुध, सूर्य आणि शनी कुंभ राशीत असून, यामुळे अनेक शुभ राजयोग जुळून येत आहेत. तसेच शुक्र आपल्या उच्च राशीत मीन राशीत असून, गुरुशी युतीत आहे. शुक्र आणि गुरुच्या युतीनेही काही शुभ राजयोग जुळून येत आहे. एकंदरीत ग्रहस्थितीचा तुमच्या मूलांकांवर कसा प्रभाव पडेल, आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. प्रेमीजनांसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रांमध्ये प्रगती दिसू शकेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला ठरणार आहे. आर्थिक प्रश्न सुटू शकतील.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. आगामी काळ दिलासादायक ठरू शकेल. क्षमतेच्या जोरावर विरोधकांना पराभूत करू शकाल. समस्या सोडवू शकाल. खूप भावनिक होणे नुकसानकारक ठरु शकेल. आगामी काळात शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. काही आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होऊ शकतील. ज्या व्यक्तीवर तुम्हाला तुमच्या कामाची पूर्ण खात्री होती, तीच व्यक्ती शेवटच्या क्षणी कुचकामी ठरू शकेल. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल. अनावश्यक खर्च करु नयेत, ते उपयुक्त ठरू शकेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आगामी काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. यश मिळेल. आर्थिक बाबतीत आगामी काळ चांगला जाऊ शकेल. मोठे आर्थिक प्रश्न मार्गी लागू शकतील. आगामी काळ अनुकूल ठरू शकेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या काळात आत्मविश्वास वाढू शकेल. समन्वय चांगला असू शकेल. अनेक महत्त्वाची कामे घरबसल्या करु शकाल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक चर्चा आणि वाद टाळा. प्रेमीजनांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले वाद मिटू शकतील. व्यवसायाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नोकरदारांसाठीही दिवस थोडा त्रासदायक असेल. कोणत्याही कागदावर न वाचता स्वाक्षरी करू नका. आरोग्याची काळजी घ्यावी.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. आदर वाढू शकेल. काम करण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्व यांमुळे विरोधक पराभूत होऊ शकतील. रागावर नियंत्रण आवश्यक आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आगामी कालावधी सकारात्मक ठरु शकेल. खूप सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकेल. सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायाशी संबंधित लोकांना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. फायदा होईल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. विरोधक मानसिक दुर्बलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणाच्याही मताने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नये. कोणत्याही करारावर योग्य पद्धतीने वाचन, आकलन केल्याशिवाय सही करु नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष