शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: मार्चची सुरुवात सर्वोत्तम! ‘या’ ६ मूलांकांना प्रमोशनची संधी, धनलाभाचे योग; बिझनेसमध्ये फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 2:42 PM

1 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील काही ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करीत असतात. ग्रहांच्या या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा तसेच ग्रहांच्या गोचराचा प्रभाव जरा सर्व राशींवर पडतो, तसा तो मूलांकांवरही पडत असतो, असे सांगितले जाते. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध या आठवड्यात राशीपरिवर्तनासह अस्तंगत होत आहे. (Numerology)
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. बुध ग्रह मूलांक ५ चा स्वामी आहे.
3 / 12
एकंदरीत ग्रहस्थिती बुधाचे राशीपरिवर्तनासह अस्तंगत होणे महत्त्वाचा मानले गेले आहे. याचा प्रभाव सर्व मूलांकांवर पडेल, असे सांगितले जात आहे. यातील काही मूलांकांना आगामी काळात आर्थिक लाभ, कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळू शकेल. औषधांच्या क्षेत्रात असलेल्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकेल. दाम्पत्य जीवनात मतभेद होऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. बुद्धी आणि वाणीच्या अद्भूत संयोगामुळे विरोधकही आपले कौतुक करू शकतील. कार्यक्षेत्रात शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. पदोन्नती किंवा उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. लक्ष्याकडे लक्ष केंद्रीत करून कामे करणे हिताचे ठरेल. कार्यालयात वरिष्ठांचा दबाव असू शकेल. मात्र, बुद्धिच्या जोरावर सर्व कामे मार्गी लावण्यात यश मिळू शकेल. जुन्या मित्राशी संपर्क होऊ शकेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. आपला सहकारी किंवा मित्राचा सल्ला आर्थिकदृष्ट्या अत्यंत मोलाचा ठरू शकेल. या काळात आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. व्यापारी वर्गाने योग्य विचारांती घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतील. ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ विशेष ठरू शकेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. प्रयत्न यशस्वी ठरतील. मेहनतीचे चीज होईल. अनेक लाभ प्राप्त होऊ शकतील. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ प्रगतीकारक ठरू शकेल. दाम्पत्य जीवनातील कटुता दूर होऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. मात्र, गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर हा काळ विशेष ठरू शकेल. धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. करिअरमध्ये वरिष्ठांशी मतभेद, वाद होऊ शकतील. मात्र, त्याने नुकसान होणार नाही. प्रेमात असलेल्या व्यक्तींना सकारात्मक काळ ठरू शकेल.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. कार्यालयातील अधिकारी कामाचे कौतुक करतील. कार्यक्षमता वाढेल. मुलांमुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. विद्यार्थ्यांना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. या मूलांच्या व्यक्तींना आगामी काळ उत्साहवर्धक ठरू शकेल. नोकरदारांचा कार्यालयातील प्रभाव वाढू शकेल. बिझनेसमध्ये प्रगती, फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात कौतुक होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ फायदेशीर ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष