शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: ‘या’ ८ मूलांकांना लाभच लाभ, अडकलेले पैसे मिळतील; इच्छापूर्ती, गुंतवणुकीत फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 7:07 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ४ महत्त्वाचे ग्रहांचे परिवर्तन होणार आहे.
2 / 12
चातुर्मासातील अधिक श्रावण मास सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात अधिक मासाची सांगता होणार असून, निज श्रावण महिना सुरू होणार आहे. या निज श्रावणात सर्व प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत.
3 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात ४ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. शुक्र ग्रह वक्री चलनाने सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. या ग्रहमानाचा कोणत्या मूलांकांना चांगल्या संधी, यश-प्रगती साध्य करता येऊ शकते? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. ऑगस्ट महिना खूप शुभ राहील. योजनांच्या यशामुळे आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नोकरदार लोकांसाठी संमिश्र फलदायी राहील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होईल. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. चांगली बातमी मिळेल. ज्या कामासाठी परिश्रम घेत आहात, ते यशस्वी होतील. चर्चेतून गैरसमज दूर होतील. नोकरीबाबत असुरक्षितता जाणवेल पण प्रत्यक्षात अशी कोणतीही अडचण येणार नाही. आर्थिक आघाडीवर अतिशय शुभ असून लाभ होईल. मन प्रसन्न राहील.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. शुभ आणि फलदायी महिना राहील. मुलाच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना खूप मेहनत करावी लागेल. एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थताही वाढू शकते. आर्थिक बाबींसाठी महिना शुभ राहील. आवश्यक कामांसाठी कुठूनही मदत मिळू शकेल. सुखद अनुभव येतील. मित्रांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. मध्यम फलदायी राहील. मुलाच्या वागण्याने मन दुखी होऊ शकते. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात, कामात स्पष्टता ठेवा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत हा महिना आव्हानात्मक असू शकतो. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे चांगले.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. ऑगस्ट महिना अनुकूल राहील. नफा मिळविण्याच्या योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. भावंडांबाबत एखाद्या गोष्टीने मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरदारांना शत्रूंमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्येष्ठांशी चर्चा होईल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतात. मन प्रसन्न राहील.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. ऑगस्ट महिना शुभ राहील. नातेवाईकांच्या तक्रारी दूर होतील. मदत करतील. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरदारांचे सहकारी पुढे जाऊन सहकार्य करतील. अडकलेले पैसे कुठून तरी मिळू शकतात. मुलांबाबत एखादा निर्णय घेऊ शकता.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. विरोधक नुकसान करण्यात अपयशी ठरतील. आर्थिक बाबतीत महिना चांगला जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रगतीच्या काही संधी मिळतील. नातेसंबंध मजबूत होतील. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रफुल्लित राहील.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. ऑगस्ट महिन्यात चांगली कामगिरी करू शकाल. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाला जास्त वेळ देता येणार नाही. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारी, व्यवसायिकांना मोठी ऑर्डर प्राप्त होऊ शकते. वेळ अनुकूल होईल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. आर्थिक खर्च जास्त असू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यवसायातील लोकांनी उत्साहात भान गमावू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तीचे बोलणे मन दुखावू शकते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष