शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: बुध गोचराने ८ मूलांकांना धनलाभाचे शुभ-योग, करिअर-बिझनेसमध्ये यश; सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 7:07 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. २४ जून रोजी बुधाचे गोचर होत आहे. याचा प्रभाव मूलांकांवरही पडेल, असे सांगितले जात आहे.
2 / 12
वृषभ राशीत विराजमान असलेला बुध अस्तंगत होणार आहे. २२ जून रोजी बुध वृषभ राशीत अस्तंगत होत असून, १० जुलै रोजी बुधाचा उदय होईल. विशेष म्हणजे अस्तंगत स्थितीत बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.
3 / 12
अलीकडेच शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री झाला आहे. त्यानंतर बुधाचे गोचर होत आहे. बुध गोचराचा कोणत्या मूलांकांना शुभ-लाभ मिळेल. कोणत्या मूलांकांना नोकरी, व्यवसाय, व्यापार, कार्यक्षेत्र आणि आर्थिक आघाडीवर यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. प्रेमप्रकरणात घेतलेले निर्णय आनंददायी भावना आणतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. जीवनात नवीन टप्प्याकडे जाण्याचा प्रयत्न कराल आणि यश मिळू शकेल.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. भागीदारीत केलेली कामे शुभ परिणाम देऊ शकतील. आर्थिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा त्रास वाढू शकतो. प्रेमसंबंधात समतोल निर्माण करून पुढे गेलात तर परस्पर प्रेम अधिक घट्ट होऊ शकेल. कौटुंबिक बाबींमध्ये महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहू शकेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन गुंतवणुकीतून शुभ परिणाम मिळू शकतील. धनलाभ होईल. चर्चेने प्रश्न सोडवले तर बरे होईल. प्रत्येक समस्येचे समाधान मिळू शकेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होत असून गुंतवणुकीतून शुभ योगायोगही निर्माण होत राहतील. कोणत्याही नवीन गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळू शकतात. मनात चिंता अधिक राहील. कामाच्या ठिकाणी मेहनतीच्या जोरावर बरेच काही साध्य करू शकाल. कालांतराने परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने होऊ शकेल. मन शांत होईल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. जोडीदाराच्या सहवासात खूप आराम वाटेल. कार्यक्षेत्रात सुधारणा होईल. हाती घेतलेली कामे संथगतीने पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास यश मिळू शकेल. व्यवहार काळजीपूर्वक करावे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आगामी काळ शानदार होऊ शकेल. प्रेमसंबंधात काळ अनुकूल राहू शकेल. परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. आर्थिक बाबींसाठीही काळ शुभ असून गुंतवणुकीमुळे फायदा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल. कामे यशस्वी झाल्याने प्रगतीकडे वाटचाल करू शकाल. वाटाघाटीने प्रश्न सोडवल्यास चांगले परिणाम दिसून येऊ शकतील.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळ आर्थिक बाबतीत खूप शुभ राहू शकेल. जुने रखडलेले पैसे येण्याची शक्यता आहे. लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी आव्हानेही वाढू शकतात. कामांत अडथळे येऊ शकतात. कालांतराने परिस्थिती अनुकूल होईल.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कार्यशैलीत चांगले बदल होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अनेक संधी मिळतील. प्रेम जीवनात वेळ आनंदी राहील. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्यातून चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आर्थिक बाबतीत पैशांच्या लाभाची प्रबळ शक्यता आहे. गुंतवणुकीतून शुभ परिणाम मिळू शकतील. काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी इतरांचा हस्तक्षेप त्रासदायक ठरू शकतो. कामावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्र