शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: ‘या’ ४ मूलांकांवर लक्ष्मीकृपा, मान-सन्मान वाढेल; सुख-समृद्धी लाभेल, चांगले होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:01 PM

1 / 12
Numerology: डिसेंबर महिना सुरू झाला आहे. यासह मार्गशीर्ष महिनाही सुरु झाला आहे. डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. यातील पहिले राशीपरिवर्तन ०२ डिसेंबर रोजी होणार आहे. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व मकर राशीत प्रवेश करत आहे.
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ चा स्वामी शुक्र ग्रह आहे.
3 / 12
कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक शुक्र ग्रह आहे. शुक्र गोचर आणि विद्यमान ग्रहमानाचा कोणत्या मूलांकांना आगामी काळात लाभ होऊ शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. मान-सन्मान वाढू शकेल. कार्यक्षेत्रात यश-प्रगतीची संधी मिळू शकेल. खर्च जास्त होऊ शकतो. अहंकारातून संघर्ष टाळलात तर बरे होईल. एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटेल. पात्र असूनही अपेक्षित गोष्टी साध्य होत नसल्याची भावना मनात येऊ शकेल.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. परस्पर संबंध अधिक घट्ट होऊ शकतील. आर्थिक बाबींवरून वादविवाद टाळल्यास चांगले परिणाम दिसून येतील. कामाच्या ठिकाणी संवादाने प्रश्न सोडवल्यास उत्तम ठरू शकेल. सुख-समृद्धीचे योग जुळून येऊ शकतील.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. संयम राखल्यास सुखद अनुभव प्राप्त होऊ शकतील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी इगो टाळल्यास चांगले परिणाम मिळतील. काही कारणास्तव मन भावनिक आणि अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडून येऊ शकतील. प्रेमसंबंधांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्रातील कामे यशाच्या दिशेने प्रगती करतील. परंतु अपेक्षेपेक्षा कमी परिणाम प्राप्त होऊ शकतील. आर्थिक लाभ होईल. कोणीतरी पुढे येऊन मदत करेल. केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळेल.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय शुभ परिणाम आणू शकतात. कामाच्या ठिकाणी मिळालेली आश्वासने पूर्ण होतीलच असे नाही. खर्च जास्त राहील. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अचानक सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. सुंदर भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात. आर्थिक फायद्यासाठी नेटवर्किंग आवश्यक आहे. प्रियजनांपासून अंतर वाढू शकते किंवा काही नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. आर्थिक लाभ होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी अचानक अडचणी वाढू शकतात. हाती घेतलेल्या कामांत काही समस्या वाढू शकतात. काही नकारात्मक बातम्या येण्याची शक्यता वाढू शकते.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक बाबींमध्ये निराशा वाढण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी एकटेपणा जाणवेल. काही कामांमुळे त्रास होऊ शकेल. परिस्थिती हळूहळू सुधारणा होऊ शकेल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आर्थिक संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील. आर्थिक लाभ होऊ शकतील. कार्यक्षेत्रात थोडीशी जोखीम पत्करून निर्णय घेतल्यास आनंदी राहाल. कालांतराने परिस्थिती सुधारणा होऊन सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक