बारा राशींपैकी 'या' चार राशींच्या मुलींना होणार या वर्षी अधिक लाभ;त्या भाग्यवंत तुम्हीच का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 14:11 IST
1 / 5यातही अनेक प्रकार असतात. जसे काही काही जणांना ग्रहस्थिती नुसार, काही जणांना राशीनुसार, काही जणांना लिंग आणि राशी यानुसार लाभाचे भाकीत वर्तवले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हे वर्ष बाराही राशींसाठी अनुकूल असले तरीदेखील पुढील चार राशींच्या महिलांसाठी, मुलींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. त्यांना या वर्षात काय मिळणारे ते पाहू. 2 / 5मेष राशीच्या मुलींसाठी २०२२ हे वर्ष खूप चांगले राहील. त्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल, तर ते स्वप्नही या वर्षी पूर्ण होणार आहे. व्यवसायाच्या नवनवीन संधी चालून येतील. नवीन कलाक्षेत्र खुले होईल. संधीचे सोने केले तर हे वर्ष सर्वार्थाने लाभदायक ठरू शकते. 3 / 5कर्क राशीच्या मुलींसाठी हे वर्ष अनेक स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करणारे ठरेल. ज्या मुलींच्या लग्नाला उशीर होत होता त्यांचे लग्न या वर्षी होऊ शकते. करिअरही चांगले होईल. जोडीदाराची साथ लाभेल. त्याच्या सहयोगाने आयुष्याला नवे वळण मिळेल आणि चांगल्या कामाची सुरुवात होईल. 4 / 5कन्या राशीच्या मुलींना या वर्षी अभ्यासात चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांसाठी मुलाखत देणार असाल तर पास होण्याची दाट शक्यता आहे. विवाहेच्छुक मुलींना त्यांचा जोडीदार या वर्षी मिळण्याचे संकेत आहेत. आयुष्याला नवे वळण तसेच करिअर मध्येही पदोन्नती मिळू शकते.5 / 5हे वर्ष धनु राशीच्या मुलींसाठी खूप यश आणि आनंद घेऊन येणार आहे. नोकरी करणार्या महिला-मुली, मग त्या व्यवसायात असोत किंवा नोकरीत, त्यांना पैसा नक्कीच मिळेल. तुम्ही शिस्तबद्ध जीवन जगल्यास, तुम्हाला अनेक पटींनी अधिक फायदे मिळू शकतात.