शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Panch Grahi Yog 2022: शनीच्या मकरेत अद्भूत महायोग! ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ अन् लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 2:26 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित, नियोजित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. नवग्रहांपैकी न्यायाधीश मानला गेलेला शनी एका राशीत तब्बल अडीच वर्षे असतो, तर मनाचा कारक चंद्र एका राशीत सर्वाधिक अडीच दिवस असतो. या ग्रहांच्या राशीबदलांचा प्रभाव सर्व राशींवर होत असतो. (Panch Grahi Yog 2022 in Makar)
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिना खास असणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही नवग्रहांपैकी सहा ग्रह राशीबदल किंवा स्थिती बदल करणार आहेत. मात्र, फेब्रुवारी महिन्यात एक अद्भूत महायोग जुळून येणार असल्याचे सांगितले जात आहे. (Panch Grahi Yog 2022 in Capricorn)
3 / 9
फेब्रुवारी महिन्याकडे जगभरातील ज्योतिषांचे लक्ष लागले आहे. या महिन्यात मकर राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग तयार होणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटी एकाच राशीत त्रिग्रही, चतुर्ग्रही आणि पंचग्रही योग तयार होतील. ज्योतिषशास्त्रात अशी घटना फार दुर्मिळ असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
नवग्रहांपैकी स्थिती बदल होणाऱ्या ग्रहांमध्ये गुरु, मंगळ, शुक्र, सूर्य, बुध आणि शनी या ग्रहांचा समावेश आहे. नवग्रहांचा राजा सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, मंगळ आणि शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान होतील.
5 / 9
मकर राशीत झालेला शनी अस्त फेब्रुवारी महिन्यात उदय होईल. यासह वक्री झालेला बुध मार्गी होईल. या महिन्यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे शेवटच्या आठवड्यात गुरु कुंभ राशीत अस्त होईल. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मकर राशीत एकाचवेळी पाच ग्रह विराजमान होणार आहेत.
6 / 9
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी म्हणजेच २६ तारखेला मंगळ गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहापाठोपाठ २७ फेब्रुवारी रोजी शुक्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. बुध मकरेत मार्गी झाला आहे.
7 / 9
तसेच आताच्या घडीला शनी मकरेत विराजमान आहे. याशिवाय चंद्र २७ फेब्रवारी दुपानंतर मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे एकाच मकर राशीत शनी, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र या पाच ग्रहांचा दुर्मिळ पंचग्रही योग जुळून येत आहे.
8 / 9
मकर राशीत जुळून येत असलेल्या या पंचग्रही योगाचा सर्वाधिक लाभ हा मेष, वृषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना होईल, असे सांगितले जात आहे. या तीन राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी अत्यंत शुभ ठरू शकेल. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने फायदे होतील. यासोबतच त्यांचे आरोग्यही चांगले राहील. आर्थिक लाभासोबतच इच्छा पूर्ण होतील, या राशींसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे, असे सांगितले जात आहे.
9 / 9
तर, धनु, कुंभ आणि मिथुन राशीच्या लोकांना थोडे सावध राहावे लागेल, आर्थिक नुकसान तसेच आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात आणि त्यासोबतच अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागेल. अन्य राशीच्या व्यक्तींना सदर काळ संमिश्र स्वरुपाचा असेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य