panchgrahi yoga in vrishabha rashi 2024 know about impact and effect on all zodiac signs
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 7:00 AM1 / 15जून महिन्यात ग्रहांचा महासंयोग जुळून येणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्रहांचा हा महासंयोग वृषभ राशीत जुळून येणार आहे. ३१ मे रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. वृषभ राशीत विद्यमान घडीला गुरु, सूर्य, शुक्र हे ग्रह विराजमान असून, त्रिग्रही योग जुळून आला आहे. बुधाच्या वृषभ राशीत प्रवेशानंतर चतुर्ग्रही योग तयार होत आहे. 2 / 15विशेष म्हणजे शुक्र हा स्वराशीत आहे. तसेच चंद्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र ग्रहाच्या वृषभ प्रवेशाने या राशीत पंचग्रही योग जुळून येऊ शकेल. ०४ जून रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार असून, ०७ जून रोजी सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत चंद्र वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे ०४ जून ते ०७ जून या कालावधीत वृषभ राशीत पंचग्रही योग जूळून येणार आहे. 3 / 15याच कालावधीत भौम प्रदोष, शिवरात्रि, शनैश्चर जयंती आहे. त्यामुळे या कालावधीचे महत्त्व वाढले आहे. पंचग्रही योगाचा अद्भूत शुभ लाभ कोणत्या राशींना मिळू शकेल, कोणत्या राशींना आगामी काळ इच्छापूर्तीचा, फायदा, नफा, सर्वोत्तम संधींचा ठरू शकेल, ते जाणून घेऊया... 4 / 15मेष: लक्षणीय नफा मिळविण्याची संधी मिळू शकते. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात. कोणतीही मोठी समस्या उद्भवेल असे नाही. नशिबाची आणि भाग्याची साथ लाभू शकते. बोलण्यात एक वेगळाच उत्साह जाणवू शकेल. इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेताना भावंडे, नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळू शकेल. राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठे पद आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळतील. काही शुभ बातम्या मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या प्रिय आणि प्रभावशाली व्यक्तीला भेटाल.5 / 15वृषभ: नशिबाची साथ लाभेल. प्रत्येक कामात भाग्य साथ देऊ शकेल. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल. सर्जनशीलता चांगली राहील. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात. कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. भागीदारीच्या कामात फायदा होईल.6 / 15मिथुन: गंभीर परिणाम होऊ शकेल असा कोणताही निर्णय उद्योजकांनी घेणे टाळावे. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात येतील. शाळा किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संमिश्र काळ ठरू शकतो. नोट्स घेण्याचा आणि नियमितपणे सुधारण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराला वेळ देणे हिताचे ठरू शकेल.7 / 15कर्क: उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत यश आणि अनेक शुभ संधी मिळू शकतात. बढतीचीही शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीतून काही लाभ मिळू शकतो. 8 / 15सिंह: नोकरी-व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना या काळात पदोन्नतीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. बॉससोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले असू शकतील. जे परदेशात जाण्यास इच्छुक आहेत त्यांना संधी मिळू शकते. व्यावसायिक असाल तर या काळात चांगला नफा मिळू शकतो.9 / 15कन्या: अनेक महत्त्वाचे सकारात्मक बदल होतील. उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवण्यात यश मिळू शकेल. नवीन मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ ठरू शकेल.10 / 15तूळ: जवळच्या मित्रांच्या मदतीने करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळू शकतील. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा वेळ आणि शक्ती यांचे नियोजन करावे लागेल. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. सावलीसारखा पाठीशी उभा राहील. संयमाने आणि समजूतदारपणाने अडचणींवर मात करू शकाल. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे.11 / 15वृश्चिक: नशिबाची साथ लाभेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. बुद्धीचा वापर करून प्रत्येक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल.12 / 15धनु: लक्ष्मी कृपेने धन आणि धान्याचे भांडार भरलेले राहू शकेल. उत्पन्न वाढू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. विवाहेच्छुकांना नवीन स्थळे येऊ शकतात. व्यक्तिमत्व सुधारेल. आकर्षणाचे केंद्र राहू शकाल.13 / 15मकर: धनलाभाच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते आणि पगार वाढू शकतो. नव्या नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. 14 / 15कुंभ: नोकरदारांना आगामी काळ चांगला जाईल. कार्यक्षमता वाढू शकेल. नात्यात अडचण येत असेल तर संवादातून मार्ग काढणे हिताचे ठरू शकेल. करिअरमध्ये पुढे जायचे असले तरी त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल असे दिसते. व्यापारांचे करार, योजना यशस्वी होतीलच असे नाही.15 / 15मीन: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. कामाशी संबंधित यश मिळू शकेल. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आर्थिक लाभ देऊ शकतील. प्रगतीची संधी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी निर्णयाचे कौतुक होऊ शकेल. कला, संगीत आणि पत्रकारिता या क्षेत्रांशी निगडित लोकांसाठी हा काळ भाग्यकारक ठरू शकेल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेम जोडीदारासोबत परस्पर विश्वास वाढेल. जोडीदाराच्या काही मोठ्या कामगिरीने मन प्रसन्न राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications