शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 7:07 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
2 / 12
जून महिन्यात जुळून येत असलेल्या ग्रहांच्या महासंयोगाचा मूलांकांवरही प्रभाव पडू शकतो. ग्रहांचा हा महासंयोग वृषभ राशीत जुळून येणार आहे. ३१ मे रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. वृषभ राशीत विद्यमान घडीला गुरु, सूर्य, शुक्र हे ग्रह विराजमान असून, त्रिग्रही योग जुळून आला आहे. बुधाच्या वृषभ राशीत प्रवेशानंतर चतुर्ग्रही योग तयार होत आहे.
3 / 12
तसेच चंद्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र ग्रहाच्या वृषभ प्रवेशाने या राशीत पंचग्रही योग जुळून येऊ शकेल. ०४ जून रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार असून, ०७ जून रोजी सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत चंद्र वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे ०४ जून ते ०७ जून या कालावधीत वृषभ राशीत पंचग्रही योग जूळून येणार आहे. या पंचग्रही योगाचा कोणत्या मूलांकांवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आर्थिक दृष्टीकोनातून आगामी काळ शुभ ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. आनंद आणि समृद्धी वाढू शकेल. गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळू शकते. काही घरगुती समस्या सोडवण्यात यशस्वी होऊ शकता. जोडीदाराचे विचार जाणून घेण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. वाणी आणि कृतीत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घर असो किंवा कामाच्या ठिकाणी संतुलित पद्धतीने वागले पाहिजे. ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. काही महत्त्वाची कामे सोपवली जाऊ शकतात. सर्वोत्तम दिले तर प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यापाऱ्यांनी नफा कमावण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणे टाळणे गरजेचे आहे. कोणतेही बेकायदेशीर काम करू नका. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहिल्यास उत्तम ठरू शकेल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. नोकरदारांसाठी आगामी काळ चढ-उतारांचा असणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळू शकते. सकारात्मक राहण्याची गरज आहे. व्यावसायिकांना अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास फायदेशीर ठरू शकेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर खास लाभ मिळू शकेल. अनियंत्रित राग तुमच्या घरातील शांतता भंग करू शकतो. आर्थिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. रोमँटिक जीवनातील परिस्थिती प्रतिकूल ठरू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसण्याची शक्यता आहे. छोट्या गुंतवणुकीचीही योजना करू शकता. कामात खूप व्यस्त असाल. मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. काही चांगल्या संधीही मिळू शकतात.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. सन्मान वाढू शकेल. परदेशात जाऊन नोकरी करायची असेल तर चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला हवेत. लवकरच चांगले परिणाम मिळू शकतात. अचानक प्रवास करावा लागू शकतो.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. नोकरदार लोक नवीन प्रकल्पाबद्दल खूप उत्सुक असतील. काम पूर्ण सकारात्मकतेने आणि उर्जेने करू शकाल. कामाशी संबंधित गोष्टींवर जास्त चर्चा करणे टाळा. व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक योजना गुप्त ठेवण्याचा सल्ला दिला जातो. विरोधक सक्रिय राहतील. धनाची देवता कुबेर कृपा करू शकेल. आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. प्रेमात असलेल्या व्यक्ती नात्याशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. नोकरी करणारे लोक त्यांच्या प्रमोशनच्या प्रतीक्षेत असतील, तर आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. धीर धरा आणि तुमची मेहनत सुरू ठेवा. व्यावसायिकांच्या संपर्काची व्याप्ती वाढेल. काही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता. भविष्यात हे फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. अचानक मोठ्या खर्चामुळे बजेट असंतुलित होऊ शकते.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वडिलधाऱ्या आणि जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यास बरे होईल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. तुमचा बराच वेळ निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया जाईल. तुम्ही असे निष्काळजी राहिल्यास त्याचा तुमच्या परीक्षेच्या निकालावर विपरीत परिणाम होईल. जोडीदारासोबतच्या नात्यात चांगला समन्वय राहील. त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्याल. काही जुने आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कामात खूप व्यस्त असाल. काही महत्त्वाच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सावध असणे आवश्यक आहे. हुशारीने वागलात तर समस्या नक्कीच दूर होऊ शकेल. इतरांच्या सल्ल्याने आर्थिक निर्णय घेणे टाळा. काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि जवळीक वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्र