शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pandav Panchami 2023: 'या' पाच कारणांसाठी साजरी केली जाते पांडव पंचमी; त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:12 AM

1 / 5
कार्तिक मासातील शुक्ल पंचमी हा दिवस होता जेव्हा पांडवांनी भगवान कृष्णाच्या आज्ञेने कौरवांचा पराभव केला होता. तो दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. पांडवांसारखे पुत्र मिळावेत यासाठी या दिवशी श्रीकृष्णासह पांडवांची पूजा केली जाते, असे मानले जाते. कौरव अर्थात दुष्ट प्रवृत्ती ती शंभर पटीने श्रेष्ठ असली तरी पांडव अर्थात सत्प्रवृत्ती त्यावर विजय मिळवू शकते, हा दिलासा देणारा हा दिवस आहे. म्हणून यादिवशी पांडवांचे स्मरण,पूजन करायचे.
2 / 5
या दिवशी गाईच्या शेणापासून पांडवांच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. शहरी भागात तशी व्यवस्था नसली, तरी ते निदान कृष्णपूजा करून आणि पांडवांचे स्मरण करून लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून मानसपूजा करू शकतात.
3 / 5
पांडव पाच भाऊ होते ज्यांची नावे आहेत:- 1. युधिष्ठिर, 2. भीम, 3. अर्जुन, 4. नकुल आणि 5. सहदेव. हे पाच पांडव होते. युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ आणि सत्यवादी योद्धा होता, भीम त्याच्या शारीरिक सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता, अर्जुन एक महान योद्धा आणि धनुर्धारी म्हणून जगप्रसिद्ध होता, नकुल एक निपुण घोडेस्वार, प्राणी तज्ञ आणि सहदेव तलवारबाजी आणि त्रिकालदर्शी होता. या पाच व्यतिरिक्त महाबली कर्ण हा देखील कुंतीचा पुत्र होता, परंतु त्याची गणना पांडवांमध्ये होत नाही. कारण जन्म होताच कुंतीने त्याला सोडून दिला होता. तसेच कालांतराने तो कौरवांना जाऊन मिळाला आणि त्यानेही अधर्माला हातभार लावला म्हणून पांडवांमध्ये त्याचा उल्लेख केला जात नाही.
4 / 5
पाच पांडवांमध्ये युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंती पुत्र होते तर नकुल, सहदेव हे माद्री पुत्र होते. या पाचही जणांचे पिता राजा पंडू असल्यामुळे त्यांना पांडव अशी ओळख मिळाली. पंडू राजाचे निधन झाल्यावर माद्री सती गेली आणि पाचही पांडवांचा सांभाळ कुंतीने केला, त्यामुळे ते कुंतीपुत्र म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
5 / 5
वत्सराज नावाच्या राजाचा मुलगा म्हणून युधिष्ठिराचा जन्म झाला. त्याचे नाव मलखान. भीमाचा जन्म वीरन नावाने झाला जो वानरस नावाचा राज्याचा राजा झाला. अर्जुनचा जन्म परिलोक नावाच्या राजाच्या पोटी झाला. त्याचे नाव ब्रह्मानंद होते. कान्याकुब्जचा राजा रत्नभानू यांच्या पोटी नकुलचा जन्म झाला, त्याचे नाव लक्ष्मण होते. भीमसिंह नावाच्या राजाच्या घरी सहदेवाचा जन्म देवी सिंह म्हणून झाला.दानवीर कर्णाचा जन्म तारक नावाचा राजा म्हणून झाला. असे म्हटले जाते की धृतराष्ट्राचा जन्म पृथ्वीराज म्हणून अजमेरमध्ये झाला होता आणि द्रौपदीचा जन्म त्यांची कन्या म्हणून झाला होता तिचे नाव वेला होते. अशा पांडवांचे स्मरण करत आपणही १८ नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी साजरी करूया.
टॅग्स :Mahabharatमहाभारत